Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meera Mahendrakar

Classics Others

4  

Meera Mahendrakar

Classics Others

कोडाईकनाल

कोडाईकनाल

1 min
7


भारताच्या दक्षिण राज्यात फिरायला जाणे सवयीचे झाले

तामिळनाडू राज्यातील एक थंड हवेचे पर्यटन स्थळ गाठले


कोडाईकनाल हे या प्रसिद्ध पर्यटन स्थळाचे नाव आहे

हिल स्टेशन ची राजकुमारी म्हणून याला संबोधले आहे


सरोवरे, द-या, आणी नुसतीच नैसगीक सौदर्याची खाण

जंगल वस्त्या, पहाड आणी हिरवा गवताळ भागाचा येथे मान 


जवळपास ३० ते ४० मिनिटांचा सुहावय घाटाचा रस्ताik uý⁶⁷ होता

एक मिनिटं ही नजर हटत नाही असा मनमोहक वळणाचा होता


सकाळीच उंच टेकडीवर बसणाऱ्या या पर्यटन स्थळावर पोहोचले

 प्रकृतीच्या सौंदर्याने नटलेल्या या शहराचे दर्शन झाले


कोडाईकनाल तलाव, पिलर रॉक्स व डॉल्फिन नोझ हे आकर्षण तिथले 

पाईन वृक्षांच्या घनदाट जंगलातले फोटोग्राफिक्स पिक्चर भारी कसले 


एकोणसाठ एकर मध्ये वसलेला बेरिजियम गोड्या पाण्याचे सरोवर बघण्यासारखे आहे 

कोडाईकनाल शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर अतिशय घनदाट जंगलात वसले आहे 


जंगली श्वापदांच्या भीतीने दुपारी तीन नंतर एकही वाहन आत जंगलात जात नाही

 जातांना दिवसाच अंधारून आल्यासारखे भीतीदायक वातावरण घाबरवल्याशिवाय राहत नाही


ब्रायन पार्क हा अनेक प्रकारची झाडे असलेला ग्रीन हाऊस आहे

 रंगीबिरंगी फुलांच्या येथे भरमसाठ जाती प्रख्यात आहे 


चॉकलेटच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर ते खरेदी करण्या भाग पाडते 

समुद्रसपाटीपासून तब्बल 7000 फूट उंचावर वसून सुद्धा आपले वेगळे एकाकी पण जपते. 


उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखा थंडावा देणारे अप्रतिम शहर या खेरीज दुसरे नाही 

वातावरणातला गारठा तुम्हाला हुडहुडी भरवल्याशिवाय सोडणार नाही 


कोडाईकनाल या शहराला एकदा तरी अवश्य भेट द्यावे 

नैसर्गिक सौंदर्य उघड्या डोळ्यांनी बघता यावे म्हणून जावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics