Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meera Mahendrakar

Comedy

3  

Meera Mahendrakar

Comedy

पहिला विमान प्रवास 😊

पहिला विमान प्रवास 😊

1 min
16


आकाशात उड़ता येण्याचा आनंद वाटी यावा ना प्रत्येकाच्या 

प्रवासरूपी का होईना अनुभव एक तरी पदरी असावा स्व:ताच्या


लगबग चालू होती, आवरा आवर सामानाची

आतुरता होती मनी पहिल्या विमानप्रवासाची


पासपोर्ट, व्हिजा गरजेचा, बाकी सारे सोडुन

चालणार नाही विमानतळावर एक ही कायदा मोडून 


विमानतळाचे आवर बघण्यासारखे होते जरी

तपास यंत्रणेची तिथल्या गम्मत वाटली खरी


पदोंपदी प्रत्येकाला बारकाईने तपासल्या जाई

अतिरेकी आहोत का आपण कधी असा संशय येई


 तपासात पास झालो कि बसायचे प्रतीक्षालय असते जिथे

 नुसती प्रतीक्षाच करायची, अजुन काही करण्यासारखे नसते तिथे


मोठ्या प्रतिक्षेनंतर दिसू लागतात धावपट्टीवरील विमाने

क्रमानेच जायचे असते तिथे घेऊन थोड़े दमाने


विमान चढ़तांना प्रवाश्यांसाठी केली होती विशिष्ट रचना

हसून स्वागत करतात हवाई सुंदरी देऊन भरमसाठ सूचना 


उड़ान घेत असते विमान तेव्हा वाटू लागते भारी

Attention बसली असतात लहानानपासून मोठी मंडळी सारी


क्षणात मूंग्यासारखी शहरे दिसू लागतात खिड़कीतून

पोटात गोळाच येतो बघुन ते उंच आकाशातून 


थोड्या वेळाने नुसतीच दिसते निळ्या पांढ-या ढगांची झालर

सेवेसाठी तयार असतात हवाई सुंदरी ताठ करून कॉलर


नुसतेच काय बसायचे म्हणून चहाची ऑर्डर दिली

शंभर रुपयात गरम पाणी आणी दूधाची पुडी आली


भलतेच हसू आले तो बेचव चहा पिवून

नको ते उद्योग करायचे नाही ठरवले कान पिळुन 


शांततेत मग झोप लागली जेव्हा

लैंडिंग ची घोषणा कानी आली तेव्हा


उतरत होते विमान तेव्हा भलतीच वाटली मजा

बोलावे वाटले पायलट ला,’सावकाश घेशील राजा’


उतरताना विमानातून पुन्हा रांगेचे नियम पाळले

जमिनीवर पाय ठेवताच उडून आल्याचे सार्थक वाटले


छोटासाच पण मजेशीर असा प्रवास संपला

अनुभव पहिलाच म्हणून गाठी बांधून ठेवला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy