Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meera Mahendrakar

Others

3  

Meera Mahendrakar

Others

दवाखाना

दवाखाना

1 min
7


सकाळी नऊ वाजताच गरीब रुग्णांची गर्दी फ़ाईल काढण्यासाठी

पाचशे रुपये खिशात घेऊन येतो बिचारा कॅन्सरशी लढण्यासाठी 


त्याचाच सवयीमुळे झाला असतो त्याला हा आजार

चुक सुधारून आपली उपचार घ्यायचे ठरवतो साचार


दिवसभर फ़ाईल घेऊन दवाखान्यात फिरत असतो

सगळ्या तपासण्या करण्याची आता मनाची तयारी करतो


डॉक्टरांना भेटून आजार लागतो त्याला कळू

राजीव गांधी योजनेतून पैशाचा आधार लागतो मिळू


उपचारादरम्यान किती होतात यातना कल्पना करवत नाही

मानसिकरित्या खचून जाऊन परीक्षेचा काळ त्याचासाठी राही 


फक्त जीव वाचविता यावा म्हणून सहन करणे चालु असते

तोपर्यंत ब-याच गोष्टि त्याचा हातून निघुन गेल्या असते


व्यसनाधीन असणे गुन्हा आहे हा आजार ते दाखवून देते

सुंदर शरीराची किंमत यातना भोगल्यावरच प्रचितीस येते


काही झाले तरी थांबायचे नाही असे रुग्ण ठरवतो

जगण्याचा आत्मविश्वासच त्याला या आजारापासुन जगवतो


निदान झाल्यावर त्याचा धीटपणा या लढाईत जिंकतो

परिक्षा संपवूण आता रुग्ण साधारण आयुष्य जगत असतो


खरंच उदाहरण अश्या रुग्णांचे काहितरी शिकून जाते

निरोगी आयुष्य असण्याची किंमत दवाखान्याबाहेर आल्यावर कळते


Rate this content
Log in