उनाड दिवस
उनाड दिवस
एक दिवस अचानक पक्षी बनावे वाटले
स्वैर होऊन आकाशात मनसोक्त उडावे वाटले
उंच गगनात झेप घ्यावे वाटले
हवेच्या संगतीत खेळ खेळावे वाटले
स्वछंदी बनून आपल्याच धुंदीत रमावे वाटले
पक्ष्यांचा रूपातच डोंगर द-यात फिरावे वाटले
हिरव्या रानात हवे तिथे बसावे वाटले
फुला फुलावरुन पाहिजे तितके बागडावे वाटले
उंच झ-याच्या पाण्यात चिंब व्हावे वाटले
खळखळ नदीच्या पाण्याशी स्पर्धा करावे वाटले
आपल्याच कल्पनेच्या दुनियेत रमावे वाटले
स्वातंत्र्य बिन फिकरिचे जगावे वाटले
स्वप्नवत गोष्टीना जवळुन पहावे वाटले
उनाड विचारांना मोकळे करावे वाटले
कसलेच विचाराचे ओझे न घेता गंमतीत रहावे वाटले
एकदातरी असा उनाड दिवस संपुर्ण जगावे वाटले