मला
मला
फार काही मागणे आता उरले नाही
ओंजळीतले कोणा कधी पुरले नाही
भरलेले ताट समोर होते जरी
शेवटचे दोन घास मला सरले नाही
भरलेला संसार होता परी
नात्यातले प्रेम मुरले नाही
तुटपुंजी कमाई होती जरी
मोहाचे क्षण हाती मी धरले नाही
कष्टाने यश मिळवले होते परी
अभिमानाचे वारे डोक्यात शिरले नाही
जगण्यापुरते सारे होते जरी
इच्छांना कधी कुरवाळत बसले नाही
अंतिम सत्य मृत्यू ठाऊक होते जरी
जगण्यास कवटाळून बसले नाही