पवित्रता
पवित्रता
1 min
11
बाप निखळ नितळ झरा
आई जगण्याचा अर्थ खरा,
कधीच नाही शिवणार वारा
जया आई वडिलांचा सहारा
अर्थ मिळे जीवनाला
जन्म लेकराला देता,
आई वात्सल्य प्रतिमा
किती अथांग हा पिता
ठाव नाही लागे त्याचा
अंतरी धुसमुस बाळा,
सुख देण्या कुटुंबाला
दोघे सोसतोय कळा
आई पवित्र मंदिर
बाप मंदिराचे दार,
तुझ्या भल्यासाठी लेका
जगती होऊन उदार
ठेव जाण त्यांच्या त्यागा
नको करु उगा त्रागा,
आई बापाविन जगी
स्वामी आहे रे अभागा …५