सखी(बायको)
सखी(बायको)
तुझ्या बटात माळताना गजरा
विसरून जातो मी देहभान
तुझ्या ओठातून निघणारे शब्द
ऐकण्यास आतुर माझे कान
संसारातली तुझी तन्मयता
जगण्यास नवी उभारी देते
प्रत्येक कठीण प्रसंगात
मन उत्साहाची भरारी घेते
जीव जडलाय तुझ्यावर सखे
नाही जगाची पर्वा मला
तू आहेस खास माझ्यासाठी
इतकेच सांगणे आहे तुला
तुझा हवाहवासा वावर
सदैव राहू दे सोबत माझ्या
प्रत्येक इच्छापुर्तीत राहू दे
माझा हात हाती तुझ्या