समुद्रसैर
समुद्रसैर
1 min
10
निळाक्षार समुद्राच्या साक्षीने बेधुंद करणारा आसमंत सारा
हळुवार वाहणारा एकाकी शांत निवांत वारा
किनारा लगतच्या हिरव्या वृक्षांचे दृश्य लक्ष वेधून घेणारे
समुद्री लाटांच्या हालचाली ओठावर हास्य पसरवणारे
अगदीच मोकळ्या हवेच्या अनुभूतीने सुखावणारा क्षण
आपलीचआपण एकांतता जपणारा प्रत्येक जण
कापसासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या ढगांचा देखावा
मन रमविणारा दुसरा नजारा या खेरीज नसावा