उन्हाळ्याची सुट्टी
उन्हाळ्याची सुट्टी
वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला
नविन शिक्षण पद्धत अंगवळणी पाडली
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सराव भरपुर केला
आज उद्या आज उद्या करत शेवटी
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रद्द झाल्या
आनंद वाटला पण उन्हाळ्याची सुट्टीच नाही आता
नाही सुट्टीत गावाला जाणे
नाही कोल्डड्रींक, नाही गारे गार आइसक्रीम
नाही मनसोक्त खेळणे!!!
आता आहे मोठी सुट्टी करोनाची
पण घरात रहायच आहे सुरक्षित!!!