Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Lokhande

Others

4.0  

Pratibha Lokhande

Others

वडील - एक खंबीर साथ

वडील - एक खंबीर साथ

1 min
193


वडील म्हणजे मुलीचा जीव ,

  हळवं असं ते अस्तित्व 

समोर कठोर मनाने वागणारा ,

  जीव तुटतो त्याचा लेकीसाठी .

कधीतरी बघा ओ स्वतःला ठेऊन 

  वडीलांच्या जागी.

किती दुखी असतो तो ,

मुलीच पहिलं प्रेम हा तिचा बाप असतो.

  ना कधी उदास होऊ देणार , जे हवं ते देणार 

कधीतरी वागतो कठोर .

 पण खर तर , नसतो ओ कठोर तो बाप ,

कधी रडला तर , डोळ्या नी रडत नाही ओ .

   काळजाच्या घावातून रडत असतो ,

तोच तुमचा - आमचा बाप असतो .

  कधी घरावर संकट येऊ नये , म्हणून 

वाटतं ते काम करतो ,

   घरातल्या सदस्यांना कधी कशाची 

कमी भासू नये , 

याचा प्रयत्न करत राहतो .

   तोच तुमचा आमचा बाप असतो .

अशा या बापाच्या जागी येऊन बघा ,

   रडल्याशिवय राहणार नाही .

बापाचं अस्तित्व , खूप हळवं आहे ओ 

  काहीही झालं तर सगळं दुःख ,

 काळजात लप उन ठेवतो .

अन् रात्री कधीतर , 

   हा विचार करत तो रडत असतो .

तोच ओ तुमचा आमचा बाप असतो ,

      तुमचा आमचा बाप असतो....


Rate this content
Log in