kanchan chabukswar

Crime

4.3  

kanchan chabukswar

Crime

असे ही कोणी...... सौ. कांचन चाबुकस्वार

असे ही कोणी...... सौ. कांचन चाबुकस्वार

3 mins
408


बराच लांबचा प्रवास होता, अचानक एका छोट्या रस्त्यामध्ये शिरल्यावर पाच-सहा पोलीस च्या जीप एकामागोमाग एक , त्यांच्या पुढे चालत जाणारे पोलीस, मध्ये फक्त साध्या कपड्यातले दोन बायका, त्यांच्यापुढे मोटर सायकल वरती हेल्मेट घातलेले पोलीस, सगळे शस्त्रसज्ज होते, एकदम मी रिक्षावाल्याला म्हटलं," काहीतरी गडबड झालेली दिसते, एवढे सगळे जण शांततेने चालत आहेत म्हणजे नक्की कुठे तरी काहीतरी झालेलं असेल."

 वेळ शांततेत गेल्यावर अचानक रिक्षावाला बोलायला लागला. त्याचा नुकताच घडलेला ताजा अनुभव तो सांगायला लागला.


सध्याच्या महामारी च्या काळात रिक्षानना देखील मध्ये पडदे लावलेले असायचे, म्हणजे रिक्षावाला आणि ग्राहक यांच्यामध्ये जंतूंची देवाण-घेवाण नको. मी जवळजवळ बांद्रा पासून ठाण्यापर्यंत प्रवास करत असल्यामुळे पोलिसांची वरात बघितल्यावर रिक्षावाल्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली.

जरा नाराजीचा सूर होता, पण त्याचं बोलणं फार मजेशीर होतं.

   त्याचे दोन अनुभव त्यांनी मला सांगितले.

पहिला अनुभव असा की रिक्षामध्ये पडदा लावले असल्यामुळे मागचे गिऱ्हाईक त्याला स्पष्ट दिसायचे नाही, रात्रीच्या वेळी लांबचं भाडं म्हणून भांडुप पासून घोडबंदर रोड कडे तो निघाला होता, वाटेमध्ये मानपाडा जंक्शन मध्ये भरपूर गर्दी होती, रात्रीची वेळ त्यामुळे सगळीकडे अंधार, मानपाडा जंक्शन अंतर बरेच अंतर पार केलं सुरज वॉटर पार्क पण ओलांडलं नंतर त्यांनी जोरात विचारलं," कहा उतरना है?" मागून काही आवाज आला नाही,झालं, त्याने गाडी थांबवून मागे वळून बघितलं मागे कोणीच नव्हतं. असं कसं झालं, गिराईक एक बुरखा घातलेली स्त्री होती, त्यातून मध्ये प्लास्टिकचा पडदा, एवढ्या चेहरा कोण बघत आहे. शुद्ध फसवणूक. म्हणून शेवटी त्यांनी मधला पडदा काढून टाकला.


   स्त्रियांच्या बाबतीत तो जरा सावध राहू लागला आणि काही िर्‍हाईक टाळू लागला.

दुसरा अनुभव फारच मजेशीर होता.

अशी संध्याकाळी बांद्र्याच्या लीलावती होऊन एक सिल्कची साडी नेसलेली स्त्री गाडी मधून उतरून रिक्षात बसली. त्यांना ठाण्यामध्ये दूर लोधा कॉम्प्लेक्स मध्ये जायचं होतं.

मॅडम आपल्या फोनवर ती कोणालातरी सूचना करत किंवा आपलं काम करत बसले होते.

अचानक हायवेच्या वरती घाटकोपर सिग्नल ला पोलिसाने विनाकारणच रिक्षा अडवली, बाजूला घ्यायला सांगितले.

गांगरून गेला, त्याने सिग्नल तोडला नव्हता, त्याच्या नंतर तो आपल्या लेन वरून व्यवस्थित चालला होता, त्यांनी रिक्षा ची स्पीड पण वाढवली नव्हती. मग काय झालं?

" बाजुमे लो खडा करो!" " लायसन्स दिखाओ, रिक्षा का कागद दिखाव!" पोलीस गुर्मी मध्ये आपल्याच तारेमध्ये बोलत होता.

त्याचा एकंदरीत अविर्भाव बघून, मागे बसलेली बाई म्हणाली," क्या हुआ? मुझे मेरे काम मे देरी हो रही है. हमे छोड दो जाने दो."

" चूप रहो, मुझे मेरा काम करने दो." पोलीस गुरकावला.

हे ऐकल्यानंतर त्या बाई अतिशय संतापल्या, त्यांनी ताबडतोब 1,2 फोन केले. शांतपणे रिक्षाच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या. पाच मिनिटाच्या आत दोन्ही बाजूने दोन पोलीस व्हॅन येऊन उभ्या राहिल्या, पोलिसांनी बाहेर उतरून खटाखट सॅल्यूट ठोकले.

रिक्षाला थांबणाऱ्या पोलीसाचे बिल्ला आणि बाकीचे ओळखपत्र तपासले. सगळेच बोगस होतं. तो पोलिस नव्हताच मुळी. हायवे वरती सुनसान ठिकाणी रिक्षाला थांबवून लुबाडण्याचे धंदे चालू होते.

  त्यालाच ताब्यात घेऊन, मागून आलेल्या गाडीमध्ये त्या बाई बसल्या. लाल दिव्याची गाडी बघून रिक्षावाला टरकला.

बाईने हसून त्याच्या हातामध्ये ठरलेले भाडे ठेवले. 


      जीप मधलं पोलीस हळूच रिक्षावाला च्या कानात कुजबुजला, "ठाणे का नया कलेक्टर मॅडम है. एकदम स्ट्रिक्ट."

त्यादिवशी कलेक्टर बाईंनी हिंमत दाखवून बोगस पोलिसाला पण पकडले आणि त्यांच्या पूर्ण टोळीला देखील गजाआड केले.


     गोष्टी सांगता सांगता माझे घर कधी आले मला कळलेच नाही. प्रवास फारच चांगला आणि अनुभव संपन्न झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime