Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

गावाकडची माणसं

गावाकडची माणसं

1 min
74


गावाकडची माणसं

असतात साधी भोळी

माणुसकीची नेहमी

मुखात त्यांच्या चारोळी


रामकृष्ण हरी माऊलीने

होते सुरू दिवसाची सुरुवात

मान सन्मान होत असतो

वडीलधाऱ्यांचा घरात


चहा असतो कोरा

पण त्यात माया असते

शेतात राब राबतात

काळी माय हिरवीगार हसते


गे मायभू ला जपत असतात

म्हणतात तिला काळी आई

बीज अंकुरे तिच्या कुशीत

तिच्यासाठी सारे काही


उभ्या जगाचा पोशिंदा

असे शेतकरी राजा

करी मेहनत रात्रंदिवस

करी सुखी तोच प्रजा


सगळ्या विषयी प्रेम

प्राणी मात्रास लावी जीव

सर्जा राजा सोबतीला

मालकाची येते कीव


सोबत कारभारनीची

बरोबरीने करी काम

गावाकडची माणसं

कष्ट करून येई घाम


लेकरा बाळाची पाटी

चाकरी करून चाले घर

कष्ट करून मिळते

त्यांना प्रेमाची भाकर


येई दमून भागून

लागे झोप ती शांत

शेतकरी जगाचा पोशिंदा

कधी होतो चिंताक्रांत


अशी गावाकडची माणसं

माणुसकी ठेवून वागतात

कष्ट करून खातात

एकोप्याने ती राहतात


नाही कधी हेवादावा

स्वकष्टची भाकर खाते

अशी माय माऊली 

दिवसभर संगतीने राबते


गावाकडची माणसं

अशी सहनशील फार

कष्ट कितीही जीवनात

नाही मानत कधी हार


Rate this content
Log in