Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

माझी शाळा

माझी शाळा

2 mins
154


माझी शाळा 

खूपच छान l

मला आहे 

तिचा अभिमान l


मला माझी शाळा खूप आवडायची लहानपणी शाळेत प्रवेश घेतला तेव्हा सगळेजण मुल, मुली रडत होते . पण मला शाळेत जायची खूप हौस होती . त्यात नवीन दप्तर , पाटी पेन्सिल हे सर्वच कस नवीन होत .


सगळेजण रडत होते आई वडील समजावत होते मी केविलवाण्या नजरेने त्यांच्याकडे बघत होते . आमचे शिक्षक म्हणाले , बघ बर ही पण तुमच्यासारखीच लहान आहे पण रडत नाही . किती हुशार आहे तेंव्हा माझ्याबद्दल माझ्या आई वडिलांना खूप आनंद होत होता .


हळू हळू सगळ्यांचे आई वडील घरी गेले . सगळेजण शाळेत रमले. एकमेकांच पाहून कोणी चित्र, कोणी पाटीवर रेघोट्या, तर कोणी सुंदर दप्तर, पेन्सिल खोडरबर न्याहळत होते .


आम्हाला नादी लावण्यासाठी आमच्या शिक्षकांनी आम्हाला गोष्ट सांगितली . प्राण्यांचे वेगवेगळे आवाज काढले . रडणारी मुले मुली सगळे खदा खदा हसू लागली . सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून शिक्षक ही खूप आनंदी झाले .


हळू हळू सगळे नियमित शाळेत यायला लागले . डब्यातल खाताना दुसऱ्यांच्या डब्यात काय आहे याच्याकडेच सगळ्यांचे लक्ष असायचे . घरी जाऊन रडून पडुन दुसऱ्या दिवशी तसाच पदार्थ हवा म्हणून हट्ट असायचा .


शिक्षक मारतील म्हणून दिलेला रोजचा अभ्यास वेळेवर व्हायचा . हळू हळू सगळे अभ्यास करू लागले . एकमेकांशी चांगली मैत्री झाली . आपल्या डब्यातला पदार्थ दुसऱ्यासोबत वाटून खावा असे सगळ्यांना वाटू लागले .अभ्यास सुरू झाला . एक वर्ष पूर्ण झाले हळू हलू विद्यार्थि सगळे रुळत गेले .


परत दुसऱ्या वर्षी शिक्षकांची शाळा जुनीच होती परंतु नवीन प्रवेश घेणारे रडके विद्यार्थी आले . हे वर्षानुवर्ष असेच चालत होते .


नवीन विद्यार्थी रुळत होते . पुढच्या वर्षी परत नवीन विद्यार्थी येत होते .


Rate this content
Log in