Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

राखी आणि रक्षक

राखी आणि रक्षक

3 mins
234


राखी आणि रक्षक हे दोघे बहीण भाऊ.

एकमेकांना खूप जीव लावणारे . घरची परिस्थिती जरा बेताचीच त्यामुळे आयुष्याला दरिद्रीच ठिगळ लागलेलं.


आई वडील शेतात काम करून पैसे मिळवायची त्यात दोघजन शाळेत घातलेले. 

खेड्यात शाळा असल्यामुळे फिस वगेरे काही जास्त खर्च नव्हता.


रक्षक राखीचा मोठा भाऊ चौदा वर्षाचा त्याचा आवाज खूप सुंदर होता. त्याला गाणे ऐकायची व गायची असा त्याचा छंद होता.

त्याचा आवाज म्हणजे जणू दैवी देणगीच देवाने त्याला दिली होती.


आठवीत त्याची बहीण त्याच्यापेक्षा लहान म्हणजे सहावीत दोघे बहीण भाऊ एकाच शाळेत शिकत होते .


पण दोघे बहीण भाऊ खूप हुशार. त्यांना परिस्थितीची जाणीव होती . 


अशेच मुले बहुतेक परिस्थिशी मात करून पुढे जातात. हे मात्र तितकंच खरं.


रक्षक स्वतः बहिणीला जबाबदारीने सांभाळत असे. सोबत अभ्यासाला तिला घेवुन बसायचा. सगळ काही व्यवस्थित चालले होते.


राखी पौर्णिमा आठ दिवसावर येवून ठेपली. तस रक्षकच्या डोक्यात विचार चक्र सुरू झालं की, आता आपल्या लहान बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावं हा विचार त्याच्या मनात चाललेला होता.


राखीला सुंदर झालरचा फ्रॉक खूप आवडायचा . कोणी मैत्रिणीने घातला की, ती त्या मत्रिनिकडे सारखे एकटक बघत बसायची . हे सगळे रक्षक जाणून होता .


कारण आई वडील कामाला जायचे म्हणून त्याचे आपल्या बहिणीवर जास्त लक्ष असायचे. तिची आवड निवड सगळ त्याला माहित होतं.


आपल्या बहिणीला आपण स्वतः तो फ्रॉक आपल्या कमाईने घेवून द्यायचा हे मनोमन त्याने ठरवले होते .


दुसऱ्या दिवशी शाळेत गेला असता गप्पा मारता मारता त्याचा मित्र त्याला म्हणाला, शहरात लहान मुलांची गाण्याची स्पर्धा चालू आहे . तुझा आवाज चांगला आहे तू का जात नाही . अरे यार 500 रू.रोख रक्कम बक्षीस आहे. तेंव्हा 500 रू. खूप जास्त वाटायचे.


"अरे तिथे जाण्यासाठी पैसे तर हवे". असा प्रश्न त्याने केला . तेंव्हा मित्रांनी त्याला आम्ही सगळे तुला मदत करतो म्हणून सागितले.


ज्याला जसे जमेल तसे सर्वांनी पैसे गोळा केले त्याला शहरात पाठवले .

 तिथे गेल्यावर सगळे गायनाचे क्लास लावलेले सगळे सुंदर गाणारे हे पाहून रक्षक थोडा घाबरला पण, आपल्या बहिणीचा चेहरा, व मित्रांनी आपल्यावर टाकलेला विश्वास हे दोन्ही गोष्टी सारख्या त्याच्या डोळ्यासमरुन जात नव्हत्या .


तसा वयाने रक्षक छोटाच पण, त्याची बुध्दी मात्र तल्लख होती. त्याने गाणेही ही एकदम सुंदर निवडले. राखी पौर्णिमा असल्यामुळे त्याने बहिणीचे गाणे निवडले होते.


'"फुलोंका तारोका सबका कहेना है" हे गाणे सुरू करताच आवाजात खरेपणा, एकदम मनापासून गायिलेले गाने टाळ्यांचा कडकडाट झाला. शिवाय गाण्याचा क्लास न लावता खेड्यातून आलेला मुलगा इतकं सुंदर गाऊ शकतो. आणि गाण्याचा विषय इतका छान किती समयसूचकता आहे एवढ्या लहान वयात सर्वांनी त्याच कौतुक केलं.


आणि त्याला पाहिलं बक्षीस मिळालं रोख रक्कम ५०० रू. त्याने सर्वांचे आभार मानले.

व घरी येतानी झालरचा छान फ्रॉक आपल्या बहिणीसाठी त्याने विकत घेतला.


बाकीचे उरलेले पैसे मित्रांनी दिलेले त्यांचे त्यांना वापस केले.


राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणीने आपल्या खावूच्या पैशातून छान मोठी राखी भावासाठी घेतली होती. राखी बांधताच रक्षक ने सुंदर फ्रॉक तिला दिला. फ्रॉक पाहताच तिला खूप आनंद झाला. तिचा आनंद शब्दात मांडणे कठीण. भैय्या तू हा फ्रॉक आणला कसा हे विचारताच त्याने सर्व हकीकत तिला सांगितली . तेंव्हा त्याच्या आई वडिलांना त्याचा अभिमान वाटला.


राखीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रक्षक ला खूप आनंद झाला.


      बहीण भावाच नातं खरचं

      निस्वार्थी प्रेमळ असतं किती

      बहिणीला आनंदी ठेवून स्वतः

      आनंदी राहणं हीच खरी वस्तुस्थिती


Rate this content
Log in