Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

लक्ष्मीच्या पावलांनी

लक्ष्मीच्या पावलांनी

2 mins
184


स्वप्नील आणि सुजाता दोघांचे लग्न झाले . सासरी परिस्थीस्ती जरा बेताचीच होती .

खाऊन पिवून सगळे सुखी होते .


स्वप्नील चांगला शिकलेला पण, चांगल्या नोकरीचा योग काही येत नव्हता मिळेल ते काम करायचे आणि घरात सगळे आणून द्यायचे.


घरात आई बाबा आणि स्वप्नील सुजाता चारच जन होते. सुजाता देखील काटकसरी आणि प्रेमळ सूनबाई होती .

घरातली सगळे कामे ती एकटी करत होती.


स्वप्नील आई वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणून आई वडील लहानपणापासून त्याचे खूप लाड करत असत. त्याला कामाची सवय नव्हती.


घराला सुखी ठेवण्यासाठी तो जबाबदारीने वागत होता . वडिलांनाही पेन्शन होती

 त्यामुळे मजेत चालले होते.


काही दिवसांनी तुम्ही आजी होणार ही गोड बातमी सुजाताने सासूबाईंना सांगितली.

घरात आनंदाचे वातावरण होते. पण सासूबाई थोड्या नाराज होत्या . जुन्या विचाराच्या असल्यामुळे त्यांना घरात छान गोंडस नातू हवा होता. सासरे समजदार होते . त्यांना मुलगी नव्हती म्हणून त्यांना घरात नात झाली तरी ते खुषच होणार होते. असे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते.


दिवस आनंदाने सरत होते. सासूबाई सुनेचा लाड करत होत्या. कौतुक करत होत्या. ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुजाताला त्रास झाला .आणि कन्यारत्न घरी जन्माला आले .


सगळे खुश होते पण सासूबाई जरा नाराज होत्या . स्वप्नील नी मुलगी झाली म्हणून पेढे वाटले . आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आजच चांगल्या नोकरीसाठी त्याला साहेबांचा फोन आलेला तो आनंदी होता.


सासरे ही खूप खुश होते . स्वप्नील आईला घेवून मुलीला पाहण्यासाठी गेला. आणि आईचा मांडीवर ते गोड कन्यारत्न देऊन म्हणाला, ""बघ आई आज किती छान दिवस लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी आली . आणि आज मला चांगली नोकरी मिळाली ".


तिला आनंदाने आजीच्या मांडीवर दिले तिचे ते सुंदर बाळरूप पाहून आजी खुश झाली आणि तिच्याशी बोबड्या बोलाणे गप्पा मारू लागली. खरच ग सूनबाई आपल्या घरी आज सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली .


घरात आनंदी आनंद झाला. सुजाता, स्वप्नील सासरे सर्व मंडळी खुश झाली.


Rate this content
Log in