Venu Kurjekar

Children Stories Others

3  

Venu Kurjekar

Children Stories Others

जंगल सारे मंगल

जंगल सारे मंगल

1 min
35


छोटे मोठे डोंगर,

खोल निळी दरी.

हिरव्या झाडां, वेलींची,

गंमतच न्यारी..... १


दाट दाट झाडी,

अन् दाट दाट जंगल.

दाट दाट जंगलात,

वारा करतो दंगल........२


पाखरांची किलबिल,

वाटे जणू जींगल .

दाट दाट जंगलात,

सारे काही मंगल......३


माकडाच्या झूंडी,

करतात किती मस्ती.

दानगट हुप्यांची,

जमते मग कुस्ती........४


झीपरे अस्वल शोधते,

मधाचं पोळं.

पोळं मिळताच आधाशी

खाऊन घेतं सगळं......५


मस्तवाल हत्तोबा,

डुलत डुलत येतात.

चाहूल लागताच वाघोबाची,

मनातून भितात........६


सुंदर,चपळ हरणे,

बागडतात कसे.

बिळात जाऊन लपतात,

भित्रुट ससे.......७


सुंदर मोर सुंदर पक्षी,

जंगल सारे सुंदर.

लांडगा, कोल्हा,तरस,गवा,

भटकते एखादे साळींदर........८


वनराज सिंहोबाची,

काय सांगावी ऐट.

आयाळ हलवीत,

जंगलावर नजर ठेवतात थेट.......९


रानफुले सुंदर,

सुंदर सारे जंगल.

मंद मंद रानगंध,

जंगल सारे मंगल.......१०


Rate this content
Log in