Venu Kurjekar

Children Stories Inspirational

3  

Venu Kurjekar

Children Stories Inspirational

सुट्टी ताईस पत्र

सुट्टी ताईस पत्र

2 mins
205


प्रिय सुट्टी ताईस,

       सप्रेम नमस्कार.

सुट्टी ताई तुझा निरोप घ्यायची वेळ आली ना गं आता.शाळा सुरू होईल लवकरच.काही मुलांची तर सुरू ही झाली.

    तुझ्या सोबत खूप छान दिवस गेलेत.

खूप धम्माल अन् मस्ती केली या उन्हाळ्यात.

खूप नवनवीन गोष्टी शिकलो.बऱ्यापैकी वाचन केलं.वर्तमानपत्रातल्या गोष्टी, कविता वाचल्या.

कोडी सोडवली.चित्र काढलीत.खूप मज्जा आली.

आईने शुद्ध लेखन आणि निबंध लिहून घेतले बरं का आमच्या कडून सक्तीने.

    सर्वात महत्त्वाचे दिवस भर आईसोबत राहीलो.आईचं काम अगदी जवळून बघीतले.

रोज सकाळी शाळेत गेलो की दिवस भर शाळा, क्लास.आई सारी तयारी करून देते, पण आईला किती कष्ट पडतात याचा विचार कधी केला नव्हता.आता जरा समज पण आली म्हणा.

सकाळ पासून आईला काम करताना बघितले.आईची दमछाक बघीतली.

साफसफाई, स्वयंपाक, उन्हाळ्यातलं वाळवन

पाहूण्यांची सरबराई, बाजारहाट,कीत्ती करते

आई.

बाबाही सकाळी ऑफिसला जातात तर रात्री च

परत येतात दमून भागून. दोघेही आमच्या साठी कीती दमतात गं.मग मनातल्या मनात मी ठरवलं आईला जमेल तशी मदत करायची.

आपलं आपण आवरून घ्यायचं.

पांघरूणाच्या घड्या घालायच्या.पाण्याच्या

बाटल्या भरून ठेवायच्या. जेवताना ताटं घ्यायची.घंटागाडीला ओला सुका कचरा वेगवेगळा द्यायचा.घर झाडून स्वच्छ करायच.अश्या छोट्या मोठ्या कामात मदत करायची.अन फालतू हट्ट करायचा नाही.

     आणि हो आजी कडून छानसा फुलांचा हार करायला शिकलो. रामरक्षा आणि अथर्वशीर्ष पाठ करून घेतले आजीने माझ्या कडून. आजोबांनी ओरीगामी शिकवली.

आजोबांना बागकामात मी मदत सुध्दा केली.

   नाट्य शिबिरात हौस म्हणून भाग घेतला.खूप मज्जा आली.

मोबाईल, टीव्ही, इंटरनेट पासून जरा दूरच राहिलो.

   एक दिवस आम्ही पिकनिक ला गेलो जवळच . खूप उन होतं.पण झाडाला आलेली

पोपटी, गुलाबी पालवी, गुलमोहर, पळसाच्या फुलांचा बहर, फुललेल्या विविध रंगी बोगनवेली अगदी डोळसपणे पाहील्या.

निसर्गाचा आनंद घेतला.

   पण सुट्टी ताई आमच्या एवढी छोटी मुलं

हंडे घेऊन,कॅन घेऊन पाण्यासाठी वणवण फिरत आहेत असे वर्तमानपत्रातले फोटो पाहून

खूप वाईट वाटलं गं. आम्ही कीती पाणी वाया घालवतो.

 पण आता ठरवलं पाणी जपून वापरायचं.

तशी विज सुध्दा.

आणि हो आजोबांनी सीडबॅकेंच सुध्दा सांगीतलय.या पावसाळ्यात जमवलेल्या बीया लावणार आहोत आम्ही.खूप झाडं ही लावणार

आहोत.

   छान,गुणी मुलं व्हायचं आम्हाला.पुढच्या

वर्गाचा खूप अभ्यास करायचा.

  खूप बोलावंसं वाटत तुझ्याशी.

GM,GN,TC अशी शार्टकट भाषा आहे आता मेसेज आहेत आणि एवढे मोठे पत्र मी का लिहितो आहे असं तुला नक्की वाटेल.

पण सुट्टी ताई माझ्या मनातलं सगळं नसते ना गं सागंता आले सविस्तर.

  बरे आता पुरे करतो.पुढच्या भेटीत खूप बोलू

मज्जा करू.वाट बघतोय.चल बाय.

तुझा लाडका

एक बालक


Rate this content
Log in