Venu Kurjekar

Romance Inspirational

3  

Venu Kurjekar

Romance Inspirational

प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा

2 mins
24


सुधा ने गेल्या महिन्यात नवीन ऑफिस जाॅईन केले. नवीन ऑफिस घरा पासून जवळ आहे आणि कामाचे तासही तसे फ्लेक्जिबल आहेत.हल्ली सुधा ऑफिस मधून घरी जाताना मेट्रो ने प्रवास करते.


संध्याकाळी साडेचार ते पाच च्या दरम्यान फारशी गर्दी नसल्याने सुधा साधारण पावने पाच ची मेट्रो पकडते आणि वीस मिनिटात तिच्या घराजवळच्या स्टेशनला उतरते.


सुधाला नेहमी आरामात कॅब किंवा स्वतःच्या गाडीने प्रवास करायची सवय आहे. तीला नेहमी स्वतः ची सोय होणे महत्त्वाचे वाटते . गर्दी, दगदग नकोशी वाटते तीला .

मेट्रो मध्ये गर्दी असते . कधी कधी बसायला जागा नसते.

नकोच ती मेट्रो. नेहमी मेट्रो च्या गर्दी ला नाक मुरडनाऱ्या

सुधाला हल्ली हे रोजच्या मेट्रो प्रवासातले वीस मिनिटे हवेहवेसे वाटतात. दिवसभरातले तीचे हे वीस मिनिट खूप आनंदात जातात.


रोज मेट्रो त बऱ्यापैकी गर्दी असते. सुधा सारखी कार्पोरेट जाॅब करणारी मंडळी , काॅलेजला जाणारे विद्यार्थी , टूरीस्ट, व्यवसायीक, छोटी मोठी कामे करणारे प्रवासी. ह्यात काही चेहरे रोजचेच तर काही नवीन चेहरे .


ह्याच गर्दीत रोज एक आजी आजोबा येतात. आजोबा साधारण पंच्याहत्तर वर्षाचे तर आजी सत्तरीच्या.

दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन मेट्रो च्या कंपार्टमेंट

मध्ये येतात. दोघेही छान तयार होऊन येतात .

ते मधल्या स्टेशनला चढतात तेव्हा मेट्रो मध्ये गर्दी असते.

एक ही सीट रिकामी नसते . उभं राहायला कशीबशी जागा

मिळते.


आजोबा रोज एखाद्या सीटचे हॅडंल धरून उभे राहतात.आणि इतर प्रवाशांना स्माईल देत हाय हॅलो करतात .

आजोबांच ते गोड हसणं व ग्रीट करणं बघून रोज त्यांना

कुणी न कुणी आपली सीट देतात.

आजोबांना जागा मिळाली की ते लगेचच आजीला बोलावतात आणि तीला बसायला जागा देतात अन् ते स्वतः तीच्या जवळ

उभे राहतात .

आजोबांनी बोलवताच आजी खूष होते लगेचच आजोबा जवळ जाते आणि आजोबांनी पटकावलेल्या सीट वर बसते.

ते दोघे आपल्या गप्पांमध्ये रमतात .


आजोबांच्या आधी जर आजीला जागा मिळाली तर आजी

आदरपूर्वक नाकारते आणि आजोबांना जागा मिळाल्या वर

आजोबांनी तीला बोलावण्याची वाट बघते .हा त्यांचा रोजचा

उपक्रम .

आजीला आपण जागा दिल्याचा आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आजीला आजोबांनी जागा दिल्याचा आनंद.


हे दोघे लव्ह बर्ड आता पावने पाच च्या मेट्रो मध्ये सगळ्यांच्या

ओळखीचे झालेत. ते आलेत की रोजचे ओळखीचे प्रवासी

आजोबांना जागा देतात आणि आजोबा आजीला जागा देतात.


सुधाला ह्या दोघांना बघतांना खूप आनंद होतो. रोजचा

दिवसभराचा थकवा , कामाचा ताण काही मिनिटे ती सगळं

विसरते


आजोबा आणि आजी किती क्युट आहेत. किती सहज अन्

सोप्पी भाषा आहे प्रेमाची ; असे तीला वाटून जाते .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance