Venu Kurjekar

Inspirational Others

3  

Venu Kurjekar

Inspirational Others

विरांगणा रामप्यारी

विरांगणा रामप्यारी

2 mins
209


आतताई तैमूर रंग ला पराभूत करण्यासाठी प्रकटेली भवानी म्हणजे विरांगना रामप्यारीबाई चौहाण.

रामप्यारीचा जन्म उत्तर प्रदेशात सहारनपूर मध्ये चौहाण ( गुर्जर ) कुटुंबात झाला.

लहान पणा पासून मुलांसारखी वेशभूषा करणारी रामप्यारी खूपच धाडसी आणि स्वतंत्र वृत्तीची होती.

शुरांच्या कथा ऐकायला, नियमित व्यायाम करायला, साहसी खेळांच्या शर्यती पहायला

तीला फार आवडे. अन्यायाचा तीला प्रचंड राग

येत असे.

युवतींना शारीरिक सक्षम होण्यासाठी तीने

जागृत केले. तो काळ तसा स्त्रियांनी बाहेर पडण्याचा नव्हता ; पण बुध्दीने हुशार व 

लढवय्यी वृत्तीच्या रामप्यारीला मात्र घरून

पूर्ण पाठिंबा होता. कारण परीस्थिती च

तशी होती.

समरकंद चा शासक तैमूर लंग याने भारतावर

आक्रमण केले. दिल्ली मध्ये पोहचे पर्यंत

त्याने लाखो जनता कापून काढली.

पुरुष, स्त्रीया , मुले सगळ्यांना कैद केले.

अनेक मंदिरांची , घरांची नासधूस केली.

त्याचा हा हैदोस , हा छळ थांबवणर

 कसा ? ंं

त्या वेळी देवपालांकडे हरीयाना, मेरठ

, सहारनपूर, हरीव्दार इत्यादी भागाचं नेतृत्व

होतं. पंचायत व्यवस्था होती.

तैमूर च्या आक्रमणाने सारे चिंतीत झाले होते.

देवपालांनी तातडीने एक महापंचायत

बोलवीली.सगळ्या समाजाला आवाहन

करून एका छत्राखाली संघटीत करण्यात आले. त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्य म्हणजे त्यात स्त्रीयानींही सहभागी

व्हायचे असे ठरले.

सक्षम अशा स्त्रियांना प्रशीक्षित करून

महापंचायत सेनेमध्ये सामील व्हायचे ठरले.

सगळ्या महीलांची एक मोठी फौज उभी करण्यात आली.

जीची पुढारी होती रामप्यारी.

तिच्यात युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुण

ओतप्रोत भरलेले होते.

बघता बघता सगळी कडून ४०,००० पर्यंत

स्त्रीया एकत्र आल्या.

स्त्रीयांच्या फौजेमध्ये अनेक गटनेत्या होत्या.

हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंदो ब्राह्मणी,

रामदाई त्यागी इत्यादी. ज्यांना गटवार जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

स्त्रीया शत्रू वर नेमून दिलेल्या वेळी हल्ला

करतील . संधी साधून शत्रू सैन्याची हत्यारं

, रसद लुटून आणतील. 

काही स्त्रियां आपल्या सैनिकांना रसद, शस्त्र

, दारूगोळा इत्यादी महत्वाच्या गोष्टी पुरवतील.

अशी अनेक कामे वाटून देण्यात आली.

या महापंचायत सेनेच्या २०,००० सैनीकांनी

दील्ली च्या पुढे तैमूर वर गुप्त पणे हल्ला केला.

तो पुढे सरकायच्या आतच सेना गावं रीकामी

करत होती. लपून बसत होती.

लुटायला असं काही च शील्लक ठेवत नव्हती.

विहिरीत कचरा टाकून ठेवत होती.

जेने करून तैमूर च्या सैनांना पाणीही मीळू

नये. दिवसा काही सैनिक तैमूर वर‌ तूटून

पडायचे . आणि रात्री रामप्यारीची फौज

हल्ला करायची .

गणीमीकाव्याने ह्या स्त्रिया लढायच्या.

या स्त्रियांना पाहून तैमूर ला मोठाच धक्का बसला.

सतत ची उपासमार, जागरण यांनी तैमूर कंटाळला . शिवाय त्याची युद्ध सामुग्री

लुटनं , रसद पळवण यामुळे तैमूर घ्या सैन्याला

दहशत बसली.

तसेच डोंगरी भागातील तीरकमान चालवण्यात

नीष्णात असलेले स्त्री पुरुष तैमूर वर तुटून पडले.

घमासान युद्ध झाले. तैमूर जखमी झाला.

त्याने युद्धातून पलायन केले.भारतीय सेना

जीकंली.

साल होतं १३९८.

वीस वर्षांची एक तेजस्वी तरुणी ४०,०००

स्त्रियांची फौज उभी करण्यासाठी सहाय्य

करते. तीचं यशस्वी नेतृत्व करते.

एखाद्या टोळधाडे प्रमाणे जीथे जाईल

तीथे सगळं नेस्तनाबूत करून, जाळून 

विध्वंस पसरवीणाऱ्या निर्दयी तैमूर लंग

नावाच्या आततायी आक्रमकाला आणि 

त्याच्या सेनेला जेरीस आणते .

अशी ही आपली भारतीय विरागंणा

रामप्यारीबाई चौहाण.

आपल्याला अभिमान वाटावी अशी 

रणरागिणी


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational