Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

जोडी तुझी नि माझी

जोडी तुझी नि माझी

2 mins
470


विजय आणि यशस्विनी दोघी जोडपी नवीनच लग्न झालेली एकमेकांवर खूप प्रेम असणारी ,तो कंपनीत कामाला जायचा पगार पाणी तस बेताचच, तीही घरात काटकसरींन संसार करायची आणि घर चालवायची.


विजयला कधी कधी कामावरून यायला उशीर होत असे तरी ती त्याच्यासाठी जेवायला थांबत असे रोजचा असाच दिनक्रम चालू होता पण येताना तो नेहमी मोगऱ्याचा गजरा तिच्यासाठी घेऊन येत असे आणि तीही तो न चुकता केसात माळत असे आणि तो म्हणत असे किती सुंदर सुवास पसरला घरभर, मी कुठेही असलो तरी या मोगऱ्याच्या सुवासाने मी वापस येईल इतक प्रेम आहे माझं तुझ्यावर आणि तू माळलेल्या गजऱ्यावर अस तो सहज बोलून गेला .तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि काहीही काय बोलता अस म्हणून ती जरा भावुक झाली.दुसऱ्या दिवशी रोजच्यासारखं तो कंपनीत गेला कंपनी संपल्यावर मोगऱ्याचा गजरा घरी घेऊन येत असतांना त्याचा अपघात झाला.यशस्विनीला ही बतमी कळताच तीच्या पायाखालची जमीन सरकली. कशीबशी सावरत ती दवाखान्यात पोहचली.


सगळे नातेवाईक दवाखान्यात पोहचले .डोक्याला मार लागला होता .आणि रक्तही बरेच गेले होते परिस्थिती जरा गंभीरच होती.ती दवाखान्यात पोहचली तिला तिच्या प्रेमावर विश्वास होता.वैद्याना भेटली तशी त्यांनी सांगितले पेशंट बेशुद्ध आहे .कधी शुद्धीवर येईल सांगता येत नाही.ती म्हणाली मी भेटू शकते का? वैद्य हो म्हंटल्यावर ती त्याच्याजवळ गेली.आणि त्याची अवस्था बघून खूप नाराज झाली.हताश होऊन बसली.पण तिच्या लक्षात लगेच एक विचार आला आणि तिने त्याचा खिसा तपासला त्यात तो मोगऱ्याचा गजरा तसाच टवटवीत होता .लोक काय म्हणतील, नवरा बेशुद्ध आणि ही गजरा लावते.याचा विचार न करता क्षणाचाही विलंब न करता तिने तो गजरा केसात माळला. त्या गजऱ्याच्या सुवासाने आणि त्यांच्या

त्या प्रेमाने विजयचा हात थोडासा हालला तिने ते बघितले आणि ती धावत वैद्याकडे गेली.तिचा तो आनंद शब्दात मावणार नाही.वैद्याना देखील थोडं आश्चर्यच वाटलं.की हा चमत्कार झाला कसा? पण हे गुपित विजय आणि यशस्विनीलाच माहीत होते. विजय शुद्धीवर आला आणि दोघे आनंदाश्रू भरलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघतच राहिले.


Rate this content
Log in