Khalida Shaikh

Comedy

3  

Khalida Shaikh

Comedy

लाॅकडाऊन मधलं लग्न

लाॅकडाऊन मधलं लग्न

2 mins
171



म्हणतात ना लग्न पहावं करुन...

अर्थात मजेशीर किस्सा घडला तो असा... मुलाचं लग्न ठरलं. हॉल बघायला सुरुवात केली...

फक्त ५० माणसांची सध्या परवानगी. ३० ऑक्टोबर १०० ची मिळेल असं गृहित धरुन मुलीकडची ५० आमची ५०.. फक्त एखाद्या वेळी पी एच डी करायला सांगीतलं असतं तर ते देखील सोप वाटलं असतं.

झालं यादी पन्नास ची करायची.. म्हणजे अहोंची पंचविस माझी पंचविस.. उगाच भांडण नको म्हणून सुरू केली..

मग लक्षात आलं मुलांचे मित्र आहेतच. त्यांना विचारलचं नाही...

विचारल्या बरोबर माझे आणि भावाचे मिळून १० घे. असं लेकाने सांगीतले... असं म्हटल्यावर आम्ही दोघांनी आमच्यातले ५/५ कमी केले. पण ते कमी करताना आपण काहीतरी पाप करत आहोत. अस जाणवतं राहिलं. आपल्या माहितीसाठी तयार केली. 

झाली तयार एकदाची लिस्ट. हॉलवर पोहोचलो.. त्याचे नियम जाणून बुकिंगसाठी पुढल्या आठवड्यात येतो सांगून उठलो तसं त्याने फर्मान सोडले येताना ५० माणसांची नावाची लिस्ट घेऊन या. मला वाटलं त्याला विचारावं कारे बाबा त्या IPL मधे नावाचे टी शर्ट घालतात तसे बनविणार आहेस का??

पण काही न बोलता आम्ही घरी आलो. 

सकाळी फ्रेश होउन परत लिस्ट बरोबर आहे ना बघायला घेतली. अन मी मोठ्याने हसायला सुरुवात केली. झालं. अहो आधी घाबरले. घे आधी पाणी पी. 

काय झालं ते सांग.. 

मी त्यांच्या समोर लिस्ट धरली. अरे इसमें हम चारोंका नाम किधर हैं. दुल्हेका नाम नहीं दिए तो वो हाॅलमें अंदर आने नहीं देगा... हेपण मग हसले. पण नंतर दोन तुमच्याकडची कमी करा मी पण यादीतील दोन कमी करते म्हणतं मस्त वाद रंगला.... 

अशी ही आठवणं कायम लक्षात राहील. 

लॉकडाउन मधलं लग्न.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy