Khalida Shaikh

Inspirational

2  

Khalida Shaikh

Inspirational

हुमेरा काझी - मुंबई इंडियन्स संघ

हुमेरा काझी - मुंबई इंडियन्स संघ

1 min
97


सिंधुदुर्ग मधील मालवण जिल्ह्य़ातील आचरा या गावातील मुंबईत रहाणारी हुमेरा झमीर काझी ही मुंबई इंडियन्स टिम मधे झळकली...


आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स टिम ही यशस्वी टिम असूनत्या टिम मधे हुमेरा काझी या ऑल राउंडरचा समावेश झालेला आहे.

हुमेरा काझी हिचे माझंगाव मुंबई येथे वास्तव्य असून या कोकंण कन्येचा मुंबई इंडियन्स टिममधे समावेश झाला आहे. आणि ही गोष्ट सर्व कोकणवासीयांसाठी अभिमानाची आहे...

दि. २७/३/२०२३ रोजी दिल्ली कॅपिटल्स टिमवर विजय प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र मुंबई महिला टिमचं कौतुक केल जात आहे.


हुमेरा काझी ही 

President T 20 Thunder's Team मधे मुंबई साठी खेळली. तीला

Women's Premier League IPL March 2023 मधे घेण्यात आलं.


हुमेरा काझीचं शिक्षणं एम कॉम पर्यंत मुंबई विद्यापीठातून झालेलं असून तीने अनेक सामने मुंबई विद्यापीठासाठी खेळलेले आहेत...


मुंबई विद्यापीठ आणि रिझवी कॉलेजने आयोजित केलेल्या वेस्ट झोन ईंटर युनिव्हर्सिटी वूमन्स क्रिकेट टूर्नामेंट ची ती सदस्या आहे..


ऑल इंडिया ईंटर युनिव्हर्सिटी टूर्नामेंट २०१५ साली फायनल मॅच खेळताना तिच्या डोक्याला बॅटिंग करताना गंभीर दुखापत झाली होती...

प्रेसिडेंट कप टी २० वूमन्स लीगमधे तिची कर्णधार म्हणून निवड झाली आणि तिने तिच्या उत्तम खेळाने ट्रॉफी मिळवून टिममधे आपलं नांव एक कोकंण कन्या असल्याचं साबित करून दाखवलं..

२०२०..२०२१ साली सिनियर वूमन्स वन डे टूर्नामेंट मधे चंदिगड विरुद्ध मुंबई टिमसाठी सामना खेळून शतक झळकवलं.


तिच्या परिवारातील आई वडिल बहिण आणि भाऊ यांचा तिला पूर्ण पाठिंबा असल्याने ती इथपर्यंत प्रवास करु शकली हे तीने अभिमानाने सांगीतले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational