Khalida Shaikh

Others

3.9  

Khalida Shaikh

Others

मनाचा रिचार्ज

मनाचा रिचार्ज

2 mins
191


अलीकडे सात आठ दिवस खूप उदास आजारी असल्या सारखं जाणवत होत. कशातच लक्ष म्हणून लागत नव्हत. रडावसं वाटत होत. पण मला हे सर्व दुर्लक्षित कराव लागणार होत. एकतर मोठा मुलगा कामानिमित्त सिंगापुरला गेला होता. घरात पसारा करून गेला होता. माझ हे सापडत नाही. तू ठेवलस का? शोधून दे. वगैरे. सर्व घर तो गेल्या मुळे सामसूम झाल होतं.माझ्या लक्षात आल. आपण अस शांत बसून चालणार नव्हतं. मी पसारा आवरला. लक्षात आलं( live certificate) हयातीचा दाखला दाखला submit करायचा होता. मी लगेच सर्व फॉर्म्स भरले. आणि R/C वॉर्ड मध्ये गेले. अर्थात जायच्या आधी एकत्र काम केलेले मित्र मैत्रिणी आहेत ना ते कन्फर्म केल. आणि मग पोचली. आणि मनसोक्त आनंद लुटला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मनाला स्पर्श करून जाणारे क्षण आठवले. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे.त्या दिवशी हसता हसता डोळ्यात आसवे ओघळली. जो मित्र तिथे नव्हता त्याला फोन करून सांगितले विवेकने. आवाजावरून ओळखल. फोनवर जुन्या आठवणी share करून हसलो. माझ्या लक्षात आलं की मी खूप मोठ्यांदा हसले होते. किती दिवस सतत सर्वांची काळजी घेण्यात मी मला माझ्या लेखणी ला विसरले होते. माझा चेहेरा आनंदाने चमकत होता. मग लक्षात ' मन' त्याला सुद्धा चार्जिंग ची गरज होती त्या मोबाईल सारखी. 100%चार्जिंग केल की मोबाइल जसा व्यवस्थित चालतो तस मन त्यालाही गरज होती. माझ मन 100%चार्ज झाल होत. मी सर्वाचा निरोप घेत ऊठले. मला पु. ल. देशपांडे ची मैत्रीची व्याख्या आठवली.

मैत्री एक सोपी व्याख्या आहे......रोज आठवण व्हावी अस काही नाही.रोज भेट व्हावी असं ही काही नाही. एव्हढच कशाला रोज बोलणं व्हाव अस ही काही. पण मीतुला विसरणार नाही ही झाली खात्री. आणि तुला याची जाणीव असणं हे झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं... मी पुन्हा रिचार्ज झालेल्या माझ्या मनाला मित्र मैत्रिणींची सुख दुःख share करण्यासाठी पुन्हा ओतप्रोत भरलेला मनाचा कलश रिकामा करण्या तिथून ऊठले.



Rate this content
Log in