Khalida Shaikh

Romance

3  

Khalida Shaikh

Romance

नातं

नातं

2 mins
238


लग्नघरचं ते. गडबड गोंधळ आवाज.

त्यात पुन्हा चाळ....

अख्खी चाळ मित्राचं लग्न म्हणून शोएब ने सजवली होती.

लाऊडस्पीकर वर गाणं वाजतं होतं.

आज मेरे यारकी शादी है.....

     निकाह लागला होता मगरीबची नमाज झाल्यानंतर रीझवानचा आणि शहनाजचा....

आब्बाजानची लाडकी..

लाल शरारा दुपट्टा आरीवर्ख केलेला...

बिंदिया हातात हिरवा चुडा... केसात जुडयावर माळलेले गजरे दुपट्टयातून डोकावत होते...रीझवानचा रुबाब काही औरच होता. मरुन रंगाची शेरवानी त्यात गुलाबी रंगाच्या गुलाबाचा हार...

दृष्ट लागण्यासारखा जोडा......

घरी आल्यावर मात्र सर्वत्र पळापळ.

कोणाला घरी जायची घाई....

शहनाज आखडून पलंगावर बसली होती....

पाहूणे येत होते कोण अच्छा भाभी. तर कोण अच्छा चाची तर कोण अच्छा मुमानी म्हणत अलविदा घेत होते....

तिला आब्बाजानची आठवण आली.

डोळे नकळत वाहू लागले. आई लहान असतानाच अल्लामियाला प्यारी झाली होती...

सर्वस्व तिचं अब्बूच होते.

हळूच तिने गालावरून ओघळणारे अश्रू पुसले.१ वाजला होता.

तेवढ्यात समीना तिची मोठी नणंद

तिच्या जवळ आली...

तिच्याच वयाची... पण घरातच चांगलं स्थळ म्हणून १८ वर्षे पूर्ण झाल्याबरोबर निकाह लाऊन दिला होता..

भाभी आप चेंज करलो....

सुबह जल्दी उठना है. भाईजान उनके दोस्त की तबियत अचानक खराब हुई इसलिए उनके साथ हाॅस्पीटल गये है. 

शायद रूकना पडे....

   शहनाजला काही कळत नव्हतं

नविन घर. नविन माणसं....

ज्याच्याशी जन्मोजन्मीच नातं

जुळलं होतं त्याची तर पुर्ण ओळख देखील झाली नव्हती.

तिने चेंज करून झोपायचा प्रयत्न केला.

जागा नविन कसली झोप न कसलं काय.....

पाणी आलं होतं.....

ब्रश करुन तिने गीझर लावला.

रीझवानचा पत्ता नव्हता.....

आंघोळ करून आली तर रीझवान

गाढ झोपलेला दिसला.

  लांब सडक केस पुसावे तर बांगड्या

किणकिणतील. रीझवानची झोपमोड होईल म्हणून तीने तसाच अंबाडा घातला.

  तिला न्यायला येणार घरचे म्हणून ती जाम खुश होती.

रीझवानशी पुरती ओळख देखील झाली नव्हती... म्हणून थोडी नाराज होती.

अख्खी चाळी झोपली होती.

दोन दिवस हल्दी मेहंदी...

जागरणं झाली होती......

तीने रीझवानकडे आपली नजर वळवली......

शांत झोपेत चेहेरा हसरा दिसत होता..... कसलं तेज दिसत होत चेहेऱ्यावर.. 

अचानक रीझवानला जाग आली.....

आणि त्याची नजर शहनाजकडे वळली. शहनाजने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली......

त्याने मनाशी ठरवलं होतं जेव्हा शहनाज एकांतात भेटेल तेव्हा तिला नाझं म्हणून हाक मारायची...

तो उठून बसला आणि त्याने नाझ

जरा यहाँ आवो... हाक मारली....

शहनाज हळूच त्याच्या दिशेने सरकली....

त्याने तीचा हात हातात घेऊन

कल रात केलिए हमे माफ कर दो म्हणून तीच्या हाताला कुरवाळले. आणि मेहेंदीची खुशबू घेण्यासाठी नाकाजवळ हात नेला. 

शहनाजने त्याच्या हातावर आपला

हात ठेवला. तिचा अंबाडा सुटून लांबसडक केस विखूरले होते.

एक बट कपाळावर आलेली रीझवानने हलकेच बाजूला केली. तीची हनूवटी वर करुन

तो तिच्या कडे एकटक बघतच राहिला.

तीचे बदामी तपकीरे डोळे..

दोघांची नजर एकमेकांत मिसळून गेली.... त्याने तिला जवळ ओढले...

तिच्या डोळ्यांचे चुंबन घेतले.....

दोघं नजरेची भाषा बोलत होते....

शब्दसुमनांची गरज नव्हती...

एकमेकांच विश्वासच नातं जणू

गुंफलं जातं होतं.

रेडिओ सिलोन वर गाणं लागलं होतं

"चौधविका चांद हो

या आफताब हो

जो भी हो तुम खुदाई कसम

लाजवाब हो.........



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance