Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

मैत्रीचा धागा

मैत्रीचा धागा

2 mins
320


अजय आणि विजय दोन्ही चांगले बालपणापासूनचे मित्र अजय हुशार असल्यामुळे आणि घरची परीस्थिती चांगली असल्यामुळे चांगला शिकला इंजिनीयर झाला .आणि कंपनीत कामाला लागला.त्याचे व्यवस्थित चालले होते.परंतु विजय घरची परिस्थिति बेताची असल्यामुळे आणि त्याचे वडील गेल्यामुळे लवकरच घरची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे काम करत करत कसे बसे बीए झाला .कारण घरी लहान बहीण भावाची आईची सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली होती.जबाबदारीच ओझं पेलायची आता त्याला चांगलीच सवय झाली होती.चांगल्या डॉक्टरच्या हाताखाली त्याला नोकरी लागली.दोन तीन वर्षे चांगलं काम करून त्याने डॉक्टरचा विश्वास कमावला होता.


काम चांगले असल्यामुळे पगारपाणी चांगले होते. आता डॉ.चा विजय उजवा हात झाला होता. कारण त्याने दवाखान्यातले सगळे छोटे मोठे काम शिकून घेतली होती.अजय विजय दोघे भेटले की अजय नेहमी विजयला चिडवायचा काही शिकला नाही शिकला असता तर माझ्यासोबत असता वगैरे ,वगैरे,परंतु नशिबाचा खेळ,एक दिवस अजयची आई कोरोनाच्या काळात आजारी पडली तिला श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागला सगळे दवाखाने पालथे घातले पण कुठेही बेड उपलब्ध नव्हता,अजय खूप परेशान होता त्याने सहज विजयला फोन लावला तुझ्या दवाखान्यात आईला कोरोना झाला---- आलं लक्षात म्हणून क्षणाचा विलंब न लावता त्याने अजयच्या आईला बेड देऊन डॉ.सांगून अर्जंट ट्रीटमेंट सुरु केली.स्पेशालिस्ट डॉक्टर असल्यामुळे अजयच्या आईच्या तब्येतीत दोन दिवसात फरक पडला.


आता अजयला चागलं कळालं होत की आपण ज्याला चिडवायचो तोच आपल्या कमी आला,तिथले त्याचे काम,डॉ. असलेला त्याच्यावरचा विश्वास हे सगळे बघून अजय अवाक झाला शिवाय आईला बरे वाटल्यावर झालेले बिल इतरांपेक्षा आपल्याला बरेच कमी लावले हे पाहून त्याला गहीवरून आले आणि डबडबलेल्या डोळ्याने विजय कडे बघत स्तब्ध झाला. असं असत कोणालाही कमी लेखू नये, कोण कधी आपल्या कामी येईल हे सांगता येत नाही.


Rate this content
Log in