Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

नात माय लेकीच🌹🙏🌹

नात माय लेकीच🌹🙏🌹

2 mins
996


लहानपणापासून आईला मी बघते आईची सारखी कामाची घाई, तिचा दिवस उजाडला की, सुरुवात व्हायची ती अंगणसड्याने ,तेव्हापासून ती सारखी उभीच, छोटीमोठी कामे करत,कधी केसांना सावरत,तर कधी घाम पुसत, संध्याकाळी उशिरापर्यंत सगळं स्वयंपाक घर आवरून मग झोपायची.


एव्हडी दिवसभर दमूनसुद्धा कधी चीड चीड नाही किंवा कधी आरडाओरडा नाही.सगळ्याच जेवण झाल्यावर गरम गरम सगळ्यांना जेवू घालून मगच ती स्वतः जेवायची.


मला जस कळायला लागलं तस मी आता आईला मदत करू लागले.जमेल ती छोटी छोटी कामी करू लागले.आईला देखील तेच अपेक्षित होत,आतापासून कामाची सवय ठेवली म्हणजे सासरी जड जात नाही ,


तिला कोणतंही काम टापटीप, नीटनेटकं , व्यवस्थित लागत असे,हळू हळू मी शिकले तीच पाहून,अभ्यास करून मी आईला कामात मदत करु लागले.


आईने हळू हळू सगळं मला शिकून दिल आता तीही थोडी निवांत झाली तिला तिच्यासाठी थोडा वेळ भेटायला लागला. स्वताच सगळं आवरून आता माझी आई आणखी सुंदर दिसू लागली.


एकदिवस मी आईचा हात हातात घेतला आणि मायेन तिला म्हणाले आई किती सुंदर दिसते ग तू? तसे ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाळा सगळ्यांच करता करता, तुमचं बालपण जपता जपता स्वतःकडे बघायला कधी वेळच मिळाला नाही.


आता तू हाताशी आली मला जरा आराम देते म्हणून आवरते कधी स्वतःच,, बघते थोडं आरशात .


तस मी आईला म्हणाले, खूप केलं आई तू आमच्या बहीण भावंडांसाठी आता तू स्वतःची काळजी घे,स्वतःचा छंद जोपास, तुला जे आवडत ते कर मनसोक्त,मैत्रिणीसोबत 

गेटटूगेदरला जा.मी आवरेलं सगळं घरच तू करते तस टापटीप ठेवेल सगळ, हे ऐकून आईचे डोळ्यांचे पाणी पापण्यांच्या काठावर आले, आणि मला जवळ घेऊन ती म्हणाली,किती समजूतदार झालं ग माझं पिल्लू,? तुझ्यासारखी समजदार लेक प्रत्येकाच्या नशिबात असू दे,अस म्हणून दोघी माय लेकी भावुक झाल्या.


Rate this content
Log in