Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

लाडाची लेक

लाडाची लेक

2 mins
522


खरच आई तू मला सासरी जाण्याचा आधी माझ्याशी खूप कठोरतेने वागली, आता मला ते पटतय तेव्हा, मला खूप वाईट वाटायचं तुझी पण कमालच आहे मनातून माझ्याबद्दल तुला इतकं प्रेम वाटायचं पण माझ्या हीतासाठी तुला कठोर वागावं लागल. लग्न ठरल माझं तेव्हापासून तू तर मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची तेंव्हा वाटायचं काय ग आई हे?माझे लग्न जमले तेंव्हा ,आई तुझ्या एका डोळ्यात मी आनंदाश्रू बघितले तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू बघितले ते फक्त मलाच दिसले ग आई। पोटचा गोळा आता परक्या घरी जाणार, हक्काची लेक आता परकी होणार , कसे असतील तिचे सासरचे ,रमेल का ती त्यांच्यात या अनेक प्रश्नांनी तुझ्या डोक्यात घर केलं असेल.


मला सगळी तुझी तगमग दिसत होती. माझ लग्न जमल्यापासून माझी आई खूप बदललेली दिसली,एवढी कठोर वागणारी माझी आई आता आमची दोघींची नजरा नजर झाली तरी,तिच्या डोळ्यात पाणी दिसू लागलं आता खूप काम करायची म्हणून ती भांबावून गेली होती, इतक्या दिवस आपल्याजवळ राहून सगळं आपलं निमूटपणे ऐकणारी लेक आता जाणार या विचाराने ती थोडी काहीतरी विसरायची, परत उत्साहाने कामाला लागायची अशी तिची अवस्था झाली होती मला ते सगळं कळत होत पण, मी शांत बसून सगळं बघत होते मला तिची माझ्याविषयीची वाटणारी तगमग कळत होती.


रोज रात्री आता आई माझ्या खोलीत येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि गुणी ग माझं बाळ ते असं म्हणत होती मी पण झोपेचं नाटक करत आणि आई खोलीतून गेल्यानंतर मनसोक्त रडून घेत असे .तिला माहित होत आपल्याकडे असताना माझ्या मुलीने कधी एकही गोष्टीचा हट्ट केला नाही .आहे त्या परिस्तित ती समाधानाने राहिली,लहानपणापासून ते लग्न जमेपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या मानाजोग्या केल्या तिला माहित होत आपले आई वडील आपलं सगळं चांगलंच करणार म्हणून, हळूहळू दिवस सरले लग्न झाले सगळा मंडप गहिवरला .बाबांची माया तर शेवटपर्यंत मला कळलीच नाही .तिकडे गेल्यावर हळू हळू सगळ्यांचे स्वभाव वेगळे चालीरीती वेगळ्या मलापण थोडं दडपण आलं होत परंतु आईची शिकवण मला पावलोपावली आठवत होती.काही दिवसानंतर आई बाबा माझ्याकडे आले.


आई तर चकीतच झाली. अल्लडपणे वागणारी माझी लेक जाबाबदारीसोबत साडीही पेलायला लागली होती. तिच्या सासरच्या कडून होणार तीच कौतुक ऐकून माझं आईच मन आतल्या आत आंनदी होत होत. मी हळूच उठून माझ्या मुलीकडे गेले आणि तिच्याजवळ जाऊन हळूच म्हटले, गुणी ग बाळ माझं तस सगळं विसरून ती ही हसू लागली.


Rate this content
Log in