Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

सिंड्रेला

सिंड्रेला

3 mins
118


एक राजा होता .त्याला सिंड्रेला नावाची सुंदर अशी कन्या होती.तिच्या आईला सारखं बर नसायच एक दिवस तिला खूप त्रास होऊ लागला .


तिने सिंड्रेलाला जवळ घेतलं , "बाळा माझी वेळ आता जवळ आली आहे.तू चांगली रहा मी स्वर्गातून तुझ्याकडे लक्ष देईल."

तेंव्हा सिंड्रेला आई आई म्हणून मोठ्याने रडत होती.


तिच्या आईने प्राण सोडला. तिचे वडील कामानिमित्त रोज बाहेर जात होते.आपल्या मुलीकडे लक्ष द्यावे म्हणून तो एका विधवेशी लग्न करतो.


तिला दोन मुली असतात ती सावत्र आई सिंड्रेलाचा खूप छळ करत असे .सगळी घरातली कामे करून घेत असत.तिला उरलेलं जेवायला देत असे.ती खूप दुःखी होती. तिला खूप आईची आठवण येत असे त्यांमुळे ती सारखी रडायची.


तिची अशी अवस्था पाहून उंदीर आणि पक्षी तिचे मित्र बनले होते.


एकदिवस राजवाड्यात एक मोठा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता,. त्यात सगळ्या सुंदर मुलींना आमंत्रण दिले होते.जी सुंदर मुलगी माझ्या राजकुमाराला आवडेल तिच्याशी मी माझ्या राजकुमारच लग्न लावून देईल अशी दवंडी देण्यात आली.


सगळे खूप खुश होते आनंदाने नाचत होते.सिंड्रेलाही खुश होती कारण तिला राजवाडा बघण्याची खूप इच्छा होती.


सिंड्रेलाच्या आईने सांगितले, "माझ्या दोन्ही मुलींना तू छान तयार कर माझ्या एखाद्या मुलीशी राजकुमारच लग्न झालं पाहिजे."


तिने आपल्या सावत्र बहिणींना छान तयार केले. ती तिच्या आईला म्हणाली, "मी पण येऊ का ?माझी राजवाडा बघण्याची खूप इच्छा आहे.तशी तिची सावत्र आई ओरडली", तुझा अवतार बघ तुला घालायला चांगले कपडे नाही.


तेंव्हा सिंड्रेलाच्या लक्षात आल तिने तिच्या आईची पेटी उघडली त्यात तिच्या आईच्या लग्नातील गाऊन होता पण तो खूप ठिकाणी उसवलेला होता.


तो ती शिवत होती .उंदीर आणि पक्षी तिला मदत करत होते.पण गाऊन शिवायला खूप वेळ लागणार होता.तोपर्यंत पार्टी संपून जाईल असे म्हणून ती रडत होती.


तेवढयात तिथे एक परी प्रगट झाली तिने जादूची कांडी फिरून त्या गाऊनचे छान नवीन कपड्यात रूपांतर केले.


आता सिंड्रेला छान तयार झाली तिच्या पायावर जादूची कांडी फिरवली छान काचेचे बूट घालून सुंदर तयार झाली.

ती परीला म्हणाली, राजवाड्यात माझी सावत्र आई बहिणी मला ओळखतील.तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जादूची कांडी फिरवली आता तुला कोणी ओळखणारी नाही आसे सांगितले.


उंदीर व पक्षी भोपळ्यावर नाचत होते.परीने त्या भोपळ्याचा रथ तयार केला आणि उंदीर बनले घोडे आणि पक्षी रथाचा सारथी बनला.

ती रथात बसली परीने सांगितले, ही जादू फक्त रात्री 12 वाजेपर्यंतच राहील याची आठवण ठेव.हो म्हणून सिंड्रेला वाड्यात पोहचली.


तीच इतकं सुंदर रूप बघून राजकुमार तिच्याजवळ आला . सगळे तिच्याकडे वळून वळून बघत होते.तिच्या सावत्र आईला बहिणीला ती ओळखु पन आली नाही.


राजकुमारासोबत बराच वेळ नृत्य केल्यावर तिचे लक्ष घड्याळीकडे गेले.बाराला 10 मिनिट कमी होते तिला परी राणीचे शब्द आठवले.

तशी ती मला जायला हवे म्हणून पळत सुटली.

पळताना तिचा एक बूट पायरीवर पडला.राजकुमार तिच्यामागे पळत होता. पण तो बूट उचलायला तिला वेळ नव्हता.ती रथात बसली आणी लवकर घरी पोहचली.


आता तिचे रूप पहिल्यासारखे झाले.राजकुमार तो बूट घेऊन म्हणाला, "मला त्या मुलीला शोधायला हवं."

सगळ्याच्या घरी जाऊन तो मुलींना बूट घालायला लावायचा पण तो कोणाच्याच पायात बसत नसे.


तो सिंड्रेलाच्या घरी पोहचला सेवकांनी विचारले , तुमच्याकडचे कोणी कार्यक्रमाला आले होते का त्या सुंदर मुलीचा हा बूट आहे.


 तिने तिच्या दोन्ही मुलीला समोर आणलं दोघीनाही बूट आला नाही.

सेवकाची वरच्या खोलीकडे नजर गेली तिथे कुलूप होते.आणखी कोणी आहे का घरात तेंव्हा तिची सावत्र आई म्हणाली, 'नाही नाही कोणी नाही" परंतु खिडकीतून सेवकाला कोणीतरी आहे असे वाटत होते.त्याने कुलूप तोडले सिंड्रेला आत होती तिच्या पायात बूट घालायचा सांगितलं तिला तो बरोबर आला.


राजकुमाराने तिला तिथेच लग्नाची मागणी घातली.ती खूप खुश झाली.तिच्या सावत्र आईचा खूप संताप झाला होता.


राजाने तिच्या वडिलांना बोलावून दोघांचे लग्न लावून दिले राजकुमार आणि सिंड्रेला आनंदात सुखात राहू लागले.


Rate this content
Log in