Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#Celebrate Brother-Sister Bond

SEE WINNERS

Share with friends

साजरे करा भावा-बहिणीतील नात्याचा बंध


भावा-बहिणीतील अतूट आणि विशुद्ध नात्याचा बंध दाखवणारा रक्षाबंधनाचा सण भारतात शेकडो वर्षांपासून साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीतील वैशिष्ट्यपूर्ण नात्याचे प्रतिक आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षणाच्या खात्रीने धागा बांधते.


स्टोरी मिररने रक्षाबंधनाचा हाच शुभ उत्सव साजरा करत आपल्यासाठी कविता आणि कथांच्या माध्यमातून भाऊ अथवा बहिणीबद्दलचे प्रेम, जिव्हाळा शब्दांत मांडण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. चला तर मग भावा-बहिणीच्या नात्यातील बंध आणखी घट्ट करुया, साहित्याच्या शक्तीने!


नियम :

  • केवळ कथा आणि कविता स्विकारल्या जातील
  • स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो. वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
  • शब्दांची कोणतीही मर्यादा नाही.
  • रक्षाबंधनावर आधारित कोणतीही कथा किंवा कविता पाठवावी.
  • आपल्या रचनेत कोणत्याही आक्षेपार्ह किंवा अश्लील शब्दांचा वापर करु नका किंवा कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावल्या जातील, असे काहीही काहीही लिहू नका.
  • एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.
  • इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते नाकारले जाईल.
  • आपली कथा स्वतः लिहिलेलीच असावी, कुठूनही कॉपी केलेली नसावी.
  • स्टोरी मिरर संपादकीय मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
  • सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.


निकाल आणि पुरस्कार :

- दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी स्टोरी मिररच्या वेबसाईटवर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.

- प्रत्येक भाषेतील सर्वोत्कृष्ट 2 कविता आणि कथा लेखकांना स्टोरी मिररकडून विजेता डिजिटल प्रमाणपत्र आणि स्टोरी मिररची सुवर्णसदस्यता मिळेल.

- सर्व सहभागी स्पर्धकांना रु. 100 मूल्याचे स्टोरी मिरर शॉपिंग व्हाऊचर आणि डिजिटल सहभागीता प्रमाणपत्र मिळेल.


साहित्यप्रकार :

- कथा

- कविता


भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली यापैकी एका किंवा अधिक भाषांमध्ये साहित्य रचना सादर केली जाऊ शकते.


साहित्य सादर करण्याचा कालावधी ः दि. 25 जुलै 2020 (दुपारी 12 वाजता) ते 5 ऑगस्ट 2020


संपर्क :

ईमेल : neha@storymirror.com

फोन क्रमांक : +91 9372458287


टीप : आपल्या रचना केवळ स्पर्धेच्या लिंकवरुनच सादर करणे अनिवार्य. तसेच स्पर्धेतील सहभाग विनामूल्य असेल.