Bipin More

Abstract Drama Tragedy

3  

Bipin More

Abstract Drama Tragedy

आजीचा पिझ्झा

आजीचा पिझ्झा

2 mins
162


मनाशी काहीतरी ठरवूनच आज्जी पिझ्झाच्या त्या दुकानासमोर येऊन थांबली.पुन्हा एकदा बटव्यावरून हात फिरवला आणि पदर सावरत क्षणभर उभी राहिली.काॅलेज वयीन ,थोडी मोठी, काही लग्नं झालेली मंडळी लहान मुलांना बरोबर घेऊन दुकानातून आत बाहेर करत होती.दीर्घ श्वास घेत मग आज्जी पिझ्झाच्या दुकानात शिरली.थंड AC चा गारवा जाणवत होता.टेबल ,खुर्च्या अगदी चकचकीत होत्या.पदर घट्ट सावरत आज्जी order of counter जवळ आली.पलीकडच्या मुलीच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते.काहीसे गोंधळलेले,काहीसे प्रश्न असलेले? कळेच ना... काय करावं? काय बोलावं?


मग आज्जी आपल्या म्हाताऱ्या पण ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली "बाळं...मला ते हवंय" तिने बोटं बोर्डावरच्या एका पिझ्झाच्या चित्राकडे केलं. मुलगी म्हणाली " पण , आज्जी त्याला ५०० रूपये तरी लागतील." तिची अडचण लक्षात घेत आजीनं बटवा समोर काढला आणि ५०० रूपये ( १०० च्या चार आणि ५० च्या दोन नोटा) दिले.मुलगी आश्चर्यचकित झाली.सवयीप्रमाणे तिने मोबाईल नंबर विचारला. आजीला कळालं नाही पैसे तर पुर्ण दिले आता फोन नंबर कशासाठी? असं की नंबर घेऊन घरी फोन करून सांगणार की आज्जी पिझ्झाच्या दुकानात आहेत ? की फोन नंबर शिवाय पिझ्झा मिळणार नाही. आज्जीला असं पाहतं मुलीने पुढे काही न विचारता त्यांना समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं.


आज्जी दुकानात शिरल्या क्षणापासून आजूबाजूच्या टेबलावर बसलेली मुलं मुली, काही जोडपी तिच्याकडे , तिच्या पेहराव पाहाता होती.त्यांच्या नजरेत " जवळच गार्डन आहे " असं जाणवतं होतं.आजी समोरच्या खुर्चीत बसल्या त्याला लागून टेबल होतं.संध्याकाळ म्हणून तशी नेहमीची गर्दी अजून व्हायची होती.टेबलावर एक लाल बाटली ठेवली होती.तिच्याकडे आजी टक लावून बघत होती.घरी तिची नातवंडं अश्याच बाटलीतून काही लालं टोमॅटोचं खाताना तिला माहीत होतं.


आता त्या मुलीने टेबलावर पिझ्झा आणून ठेवला.खोका अर्धा उघडाच असल्यामुळे गरमागरम पिझ्झाचा सुगंध येत होता.फोनची भानगड आजीला माहीत नव्हतीच म्हणून तिने लगेच खायला सुरुवात केली.बाजूच्या टेबलावर बसलेली मंडळी गोंधळली होती.थोडं वेगळं वाटत होतं पण काही जण खुश होते तर काही अगदी काहीही नवीन नसल्याच्या भावनेने दुर्लक्ष करीत होते.


पिझ्झा तर खाऊन झाला पण आजीच्या टेबलावर कुणी फिरकलं नाही.कदाचित आजीचा शोध वेगळा होता.एक पिढी नव्या जगाशी नातं बनवू पाहत होती आणि तेही त्यांच्या स्टाईल मध्ये. हळूहळू प्रयत्न करीत होती.बंद खोल्या....बंद मनं आणि बंद नात्यांचा शहरात.

नात्यांचा शोध महागडा होतोय का????


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract