Bipin More

Abstract Classics

2  

Bipin More

Abstract Classics

मंथन

मंथन

1 min
103


कोसळून गेलेल्या पावसाने मन दहा दिशांना उधळलं. छपरावर काही थेंब रेंगाळत उरले , काहींनी हळूवार निरोप घेतला.

कुठल्या एका थेंबावर मन फारसं अडकलं नाही पण घरंगळत जावं , संपावं इतका धीर झाला नाही. जीवनाच्या उत्कट आशावादाची जोड करतं करतं वाटेवर लांब चाल केली जिथून आता सुरूवात आणि शेवट दोन्ही बिंदू अंधूक आहेत. मध्यानात ध्यान करावं असं अनासक्त व्यसनं नाही. अशा ह्या चौकात उभं राहणार एक आयुष्य .


वेळ प्रसंग आणि आयुष्य ह्या त्रिसुत्रात अडकणाऱ्या जीवाची फडफड फार हेलावणारी आहे. जे कळत नाही ते मोठं दुःख असूनही मोठं वाटत नाही म्हणून कळालं तर सल जास्त जाणवते.

अजाणतेपण जर शल्य आहे तर परिणामी ते कवच आहे. हे कवच गळून पडता क्षणी जाणवतात ते सुंदर जगाचे डाग.अशा गोंधळात हवा हात त्याचा.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract