Bipin More

Abstract

4  

Bipin More

Abstract

अनुभव पाऊस

अनुभव पाऊस

1 min
405


पाऊस आणि मन यांचं किती घट्ट नातं आहे.पावसा इतका सरळं भावनांचं गुंता सोबत आणणारा, वाढविणारा, सोडविणारा दुसरा ॠतू नाहीच.पावसात थेंब असतात...मनाच्या भावना असतात. दोन्हींचा ही नेम नसतो.


पावसाचे थेंब जिथे बरसतात तिथं नवीन अनुभव देतात.मनाच्या अवस्था बदलल्या की नवे अनुभव मिळतात.पाऊस प्रत्येक थेंबात काही वेगळी भावना आणतो.जे मनं ज्या वळणावर असतं ते तिथून पाऊस अनुभवत. पाऊस आला की आठवणींना उजाळा येतो. नवीन आठवणी बनवण्याची संधी. होरपळून निघालेल्या मनाला विसावा मिळतो.

निराशेच्या गर्तेत सापडलेल्या नवीन आशा मिळते.देवाने जणू प्रत्येक थेंबावर आशीर्वाद पाठवलेला असतो. हर जीवासाठी काही तरी भेट असते.


जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाऊस वेगळी जाणीव देतो.


हरवून जावं अश्या बऱ्याच संधी येतात, सापडण्याचा आनंदही मिळतो.पाऊस आलाच नाही तर हे जगणं कसं व्हावं. ही कल्पना सुद्धा भयावह वाटते.अनोळखी जगणं सर्वांथाने संपन्न करतात त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract