Bipin More

Abstract

2  

Bipin More

Abstract

प्रार्थना

प्रार्थना

1 min
91


हो प्रार्थना कराच...ज्या कुठल्या अदृश्य शक्तीवर तुमचा विश्वास आहे तिच्याजवळ करा.प्रार्थना करणं म्हणजे काय निव्वण देव देव करणं नाही.ते एक विज्ञान आहे. मनावर घालून घेतलेल्या मोठमोठ्या डोंगरावर ते नक्कीच मात करू शकतं.

नक्की प्रार्थनेत आपण काय करतो....


१.प्रार्थनेत आपण दुःखाला वाचा फोडतो.त्या अदृश्य शक्ती समोर वेदनेला शब्दांतून मांडतो.


२.कुणी आपलं दुःख ऐकून घेतयं वा घेतलं यांनी मन मोकळं होतं.


३.उत्तरांची अपेक्षा नसतेच बहुधा पण तरीही आपलं आपल्यालाच बरं वाईट कळतं, मार्ग सापडतो.


४.आणि महत्त्वाचं म्हणजे माझं कुणीतरी आहे या भावनेने मनाला एक आधार मिळतो.


बघा किती सोपं आहे हे.... आणि देव देव तरी काय हो शेवटी एक न दिसणारी ताकदच ना...मग एकटेपणा येऊच कसा शकतो.लोक मला कसं पाहतात या विचारात जगायचं राहून जातंय का.प्रत्येक माणूस ही आपली आपली एक गोष्ट.कुणाची खूप छान कुणाची तितकी नाही.पण गोष्ट आहे ना...


मरण अटळ आहे मग तो ठरवून शेवटं केला इतकेच काय? पण प्रश्न तो नाही..

प्रश्र्नांच्या उत्तराचा आहे.

विश्वास डळमळीत होतो.. आणि मनाची पोकणी विनाशकारी विचारांनी पोखरली जाते एवढंच.


मग ती अशी अर्धवट का सोडावी??आपल्या पुरता विचार केला तर ही जग रहाटी कशी चालावी. अंतिम ध्येय काय आहे...यावरून खरंतर समॄद्ध जीवनाची व्याख्या आखावी मग वाट्याला आलेली दुःख क्षणभंगुर आणि छोटी वाटतात.


प्रतिक्रिया देणं हा जरी मनाचा स्थायिभाव असला तरी त्यालाही सद्सदविवेक बुद्धीच्या जोरावर लगाम घालता आला पाहिजे.मग विचारांच्या गर्दीत हरवून जावं का...????


शिक्षण विचार करायला शिकवत आणि थांबवायला नाही??...थांबा , लक्ष द्या , लक्षात घ्या विचारा स्व:ताला..? काय महत्त्वाचं आहे ते... जगणं की आणखी काही..?????


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract