Bipin More

Abstract Children

3  

Bipin More

Abstract Children

प्रवास

प्रवास

1 min
144


एक प्रवास आठवतोय...

मी सकाळी बसने ऑफिसला जातो होतो..बस बरीच मोकळी होती.. मधल्या एका स्टॉपवर एक भिकाऱ्याचं पोरगं बसमध्ये चढलं.. सवयीप्रमाणे सुशिक्षित प्रवाशांनी त्याला बघून नाकं मुरडली.. कंडक्टरला त्याने पैसे दिले आणि "हिरानंदानी" साठी तिकीट घेतलं... कंडक्टरनी त्याला उभा राहायला सांगितलं... तरीही तो बसला तर सीटवरच्या सहप्रवाशानी उठून जागा बदलली...ते पोरगं मस्त खिडकी शेजारी बसलं आणि त्यानी मजेत प्रवास केला.


वर वर पाहता काहीच वेगळं घडलं नाही...पण त्याच्या लहान वयात त्याला जगाची काय ओळख झाली? माणसं आपल्याकडे बघून नाकं मुरडतात कारणं आपण भिकारी आहोत... आपल्याला सामान्य वागणूक मिळणार नाही...त्याचे आईवडील सांगतात लोक दिसले की भीक माग... आणि असंच असंच जग..


सगळ्यांना वाटत भिकारी नकोत मग तयारी कुणी कुणी करावी...हे भिकारीपण कसं जायचं...


उमेद कोण कुणाला देणार?????? नव्या , सुंदर आयुष्याची...

का तो अधिकार फक्त आपलाच.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract