Abhilasha Deshpande

Horror Tragedy Crime

3  

Abhilasha Deshpande

Horror Tragedy Crime

चिरंजीव

चिरंजीव

3 mins
142


पात्र - गंगू व रमा , रमेश ,सुरेश व सुलभा ,रागिनी ,सुरेखा ,अनिकेत ,अभिषेक 


  एक गाव गोवंडी त्या ठिकाणी पडके घर असत. त्याठिकाणी दोन म्हाताऱ्या बायका व दोन नात त्याच्या बायका दोन पतवंड व एक लग्नाची नात राहत होते. दोन बायका सासू व सून ह्या तिर्थयात्रेला गेल्या. घरात भरपूर सोन नाण व पैसा होता. याची बातमी दरोडेखोराला लागली.घरात वयस्कर नाही. गंगूबाई व रमा ह्या तिर्थयात्रेला गेल्या. एक दिवस 2 दरोडे खोर आले.मोठा नातू रमेश दुसरा सुरेश ,रागिनी व सुरेखा मुलगी सुलभा ,अनिकेत व अभिषेक पतवंड झोपले होते. घर तसे गावाच्या वेशीला होते व आजूबाजूला शेत होते.दरोडेखोर हत्यारा निशी घरात दार उघडून आत शिरले. रमेश,सुरेश व त्याच्या बायका उठल्या. त्यांना दरोडेखोरांनी डोक्यावर मारहाण केली. सुलभाला सुद्धा मारले. अनिकेत व अभिषेक ला मारले ने तेथेच मरुण पडले. डोक्यावर मारहाण केल्यामुळे ते सगळे थोड्या थोड्या अंतराने गेले. घरातील सर्व सोन्याचे दागिने व पैसा तांब्या पितळी ची भांडे उचलून चारही दरोडेखोर पसार झाले. ही गोष्ट दोनशे वर्षापूर्वी ची गावातले लोक जावे झाले. आपआपल्या शिवारात जायला लागले. त्यांना हे घर उघडे दिसले. व घरातून कोणताही आवाज नव्हता. कुत्रे भुंकत होती. तेव्हा गावातल्या मुखिया व काही लोक त्याठिकाणी आले. पोलिसांना खबर दिली. त्यावेळी इंग्रजाचे राज्य होते. त्यांनी त्याची प्रेते उचलली. घरातील सर्व लंपास केले व घरातल्या सासू व सून दोघी गावातल्या लोकांसोबत तिर्थयात्रेला गेल्या व त्या उद्या येणार हे पोलिसांना समजले दुसऱ्या दिवशी त्या आल्या व घरात हे सगळे पाहिले व बेशुद्ध पडल्या व त्या ही गेल्या. त्या दोघींना हे दुःख पाहल्या गेले नाही. तेव्हापासून त्यांचा जीव या घरात व माणसात असल्यामुळे रोज रात्री दिवा लावतात. व त्या दरोडेखोरांची वाट पाहतात. त्यांना मारुण बदला घ्यायचा आहे. त्या घराकडे कोणी फिरकत नाही. आजूबाजूला भरपूर तण वाढले आहे. फक्त कुत्रे तेथे दिसतात. त्या रात्री 4 चोर चोरी करण्याचा उद्देशाने गावात आले. व या घरात दिवा पाहून ते त्या घराजवळ थांबले तर त्यांना ह्या दोन बायका दिसल्या व त्यांचे पाय उलटे होते. दिवा लावून त्या आपसात बोलत होत्या हे चारही चोर भिले व तेथून जवळच्या गणपती मंदिरात पारावर झोपले काही गावातले लोकांशी त्यांनी दुसऱ्या दिवशी गप्पा मारल्या. त्यांना वरील सर्व बातमी समाजली. त्यांनी गावातल्या लोकांना सांगितले. त्या दोन बायका अजून त्या दरोडेखोराची वाट पाहत आहेत. त्यांना मुक्ती मिळाली नाही. त्याकरिता गावातील लोकांनी काही तरी करायला पाहिजे. गावातल्या सरपंच व सदस्य यांची मिटींग झाली. व पोलीसांना कळवले. आपण या घराचे व शेताचे काही तरी करायला पाहिजे.तेव्हा पोलीस आले. व दरवाजा उघडला व तो उघडत असताना त्या माणसाचा हात वाकडा झाला. एका मांत्रिकाला कळविण्यात आले. व विधी वत पुजा झाली व त्या २ बायकांना विचारले त्यांनी सांगितले आम्हाला त्या दरोडेखोराचा जीव घेऊन बदला घ्यायचा आहे. म्हणून आम्ही रोज रात्री या ठिकाणी थांबतो. पण तो आता येत नाही. मांत्रिकाने सांगितले आता त्या घटनेला 200 वर्ष झाली. आता तुम्हाला ते दरोडेखोर जिवंत नसतील. तुम्हाला मुक्ती मिळविण्याकरिता मजूर लावून शेत साफ करुन फुलझाडे व भाज्या व काही धान्य लावावे व तुमची येथे का करावे म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल. तेव्हा त्या काहीच बोलायला तयार नव्हता. आम्हाला त्या दरोडेखोरांचा बदला घ्यायचा आहे. असे म्हणत होत्या. शेवटी एका सदस्याने म्हटले आम्ही याठिकाणी वृध्दाश्रम काढायचा म्हाताऱ्या माणसाची सोय होईल. त्यावर त्या तयार झाल्या.

त्या वृध्दाश्रमाचे नाव काय ठेवावे त्यावर त्या म्हणाला "चिरंजीव" वृध्दाश्रम गावातले लोक तयार झाले. व शेताची साफसफाई करण्यात आली. घर दुरुस्ती झाली.फुलझाडे व भाज्या शेतात लावल्या गेल्या.गावातले दहा वृध्द तेथे राहायला लागले. विरंगुळा म्हणून शेतात काम करत म्हातारे आनंदित दिसत होते. वृध्दांची संख्या वाढत होती. घराचे बांधकाम घराचा परिसर वाढवला. वृध्दाची 50 संख्या झाली. व त्या घराला वेगळे रुप आले. अशा रितीने वृध्दाश्रम फुलला व त्याचे नाव चिरंजीव ठेवल्या गेले. त्या दोघी ही सासू सुना त्या परिसरातून मुक्ती घेवून गेल्या.



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror