Abhilasha Deshpande

Tragedy

2  

Abhilasha Deshpande

Tragedy

अतिक्रमण

अतिक्रमण

1 min
49


 आज-काल अतिक्रमणाची तर फॅशनच झाली आहे 

अतिक्रमणे काय कोठेही होऊ लागली आहेत गरीब तर गरीब श्रीमंतांनी ही जागा व्यापली आहे 

जाती धर्म वर्ग यांची मक्तेदारी संपली आहे अतिक्रमणे काय आजकाल कुठेही होऊ लागली आहेत


 राखीव जागेवर इतर जातींनी अतिक्रमण केले आहे 

ईबीसी वर धन धनदांडगे हात मारत आहे

 कोणी जागेवर ,कोणी धर्मावर, कोणी मनावर तर कोणी तन वर अतिक्रमण करीत आहे 

अतिक्रमणे काय आजकाल कुठेही होऊ लागली आहेत


गोरगरीब वंचितांच्या हक्कावर ही अतिक्रमण होत आहे

आज काल काय आहे अतिक्रमणाची फॅशनच झाली आहे 

 राजकारणी सामान्यांच्या हक्कावर भुरटे प्रस्थापितांच्या कवितांवर अतिक्रमण करीत आहे 

अतिक्रमणे काय आजकाल कुठेही होऊ लागली आहेत


 अन्नातून आजारांनी अतिक्रमण केले आहे

 विज्ञानावर अंधश्रद्धेच अतिक्रमण झाल आहे

 हवेमध्ये कोरोनाने अतिक्रमण केले आहे

 शिक्षणावर कॉपी बहादूरांनी अतिक्रमण केले आहे

अतिक्रमणे काय आजकाल कुठेही होऊ लागली आहेत


  मुक्या प्राण्यांच्या हक्काच्या जागेवर मानव

 बेगुमान अतिक्रमण करीत आहे

 म्हणून तर पर्यावरणाचा नाश होत आहे

 कॉन्ट्रॅक्टर नेमून बजेट बसवून

 निर्लज्ज सरकार सुशिक्षितांच्या हक्कांच्या

 नोकरीवर जाहीरपणे अतिक्रमण करीत आहे

 अतिक्रमणे काय कोठेही होऊ लागली आहे


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy