Abhilasha Deshpande

Others Children

3  

Abhilasha Deshpande

Others Children

मदर्स डे

मदर्स डे

7 mins
223


मे महिना , उन्हाची काहिली , अंगाची नुसती लाही लाही होत होती . वीजेचे पंखेही नुसती गरम हवा फेकत होते .या गरमीने जीवही खूप घाबरा होत होता .थोडा आराम वाटावा म्हणून मी लिंबू सरबत बनविले , त्यात बर्फाच्या दोन कूब्ज टाकल्या , छान गारेगार वाटले .हुssssश करत मी सुस्कारा सोडला .मनावरची मरगळ गेली . थोडं फ्रेश वाटलं .


शुभम , तुला काही बनवून देऊ काय ? काही हवंय काय बाळ ? " " नको , काही नको " " अरे दुपारचे चार वाजलेत . भूक लागली असेल , काही तरी खा बेटा "" नको म्हटलं ना , समजत नाही काय तुला ?" " अरे , असं बोलतात काय आईशी " " मग , तूच शिकव कसं बोलायचं ते " " शुभम " माझा आवाज चढला , तसा तो गप्प झाला , पण मी चुकलो , साॅरी मम्मी , असे शब्द जणू त्याच्या डिक्शनरीतच नव्हते . 


काय करावं या पोराचं , कसं समजवावं , काय चुकतंय माझं .कोठे कमी पडतेय मी . काहीच कळत नाही .मी जितकं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते तितका त्याच्यातील आणि माझ्यातील दुरावा वाढतोय .


शुभमच्या बाबांशी बोलले तर म्हणाले , अजून लहान आहे तो , त्याचं भावविश्व निराळं , निरागस असतात लहान मुलं , एखादी गोष्ट मनात बसली कि तीच धरुन ठेवतात . त्याच्या कलेनं घे . कोणत्या गोष्टीची जबरदस्ती करू नकोस त्याचेवर , त्याच्याशी गोड बोलून त्याच्या मनाची निरगाठ सोडव ." अहो , तेच तर करते मी . त्याच्याशी बोलायला जाते . तर तोच तुटकपणे वागतो , होय , ठीक आहे , करतो मी , अशी उत्तरे याच्याकडून मिळतात , संवाद वाढवू तरी कसा .?" हे बघ , मीनाक्षी थोडं सबुरीने घे , होईल सगळं ठीक , काळजी करू नकोस , पुढील आठवड्यात आपण तुझ्या मामेभावाच्या लग्नासाठी गावी जाणार आहोत , लग्न समारंभ , व तेथील वातावरणात , समवयस्क मुलात रमेल तो , आणि होईल सगळं नीट .


विचारांच्या तंद्रीतून मी बाहेर आले , पाहिले तर घड्याळ्यात साडेपाच वाजलेले , ऊन कललं होतं .चला लग्नासाठी खरेदी करायचीय , मामा मामीसाठी आहेर , नवरदेवासाठी भेटवस्तू , शुभमसाठी एखादा नवीन ड्रेस खरेदी . मी तयारी केली . " शुभम चलतोस काय रे माझ्यासोबत , चल काही खरेदी करायचीय " " नको मम्मी , तूच जा " " अरे चल रे , दिवसभराचा घरात आहेत , सायंकाळचं थोडं मोकळ्या हवेत फिरणंही होईल . घरात नुसतं कोंदटल्यासारखं नाही वाटत तुला " " नाही मी नाही येत ,मी घरीच बुद्धीबळाची मॅच खेळतो लॅपटाॅपवर , तू जा " " अरे बाळा , मॅच नंतरही खेळशील ,चल थोडं बाहेर " " नाही नको " मग मी काही बोलले नाही , शुभमचे बाबा प्रकाशचे शब्द मला आठवले , " थोडं सबूरीने घे , त्याच्या कलेनं घे , जबरदस्ती करू नकोस


मी एकटीच निघाले .मामीसाठी छान साडी , मामासाठी शर्ट पँटचं कापड ,घेऊन झाले . आता राहिली होती भेटवस्तूंची खरेदी . नवीन नवीन अनेक प्रकारच्या भेटवस्तूंच्या व्हरायटीज होत्या .काय घ्यावे , मीच थोडे गोंधळले , निर्णय होईना .


" हॅलो काकी " " हॅलो रितेश , काय रे कसा आहेस , कोण आहे सोबत " " बाबांसोबत आलोय , परवा मदर्स डे आहे ना काकी , मम्मीसाठी भेटवस्तू व ग्रीटींग घेण्यासाठी आलोय .तिला सरप्राइज द्यायचंय . " " नमस्कार ताई , रितेशचे बाबा बोलत होते , मुलांचा हट्ट पुरवावाच लागतो , आणि आई प्रती चांगलं करताहेत मुलं तर प्रोत्साहन द्यायलाचं हवं ना " " होय भाऊ , बरोबर म्हणताय तुम्ही , कशा आहेत निताताई , बरेच दिवसात तुम्ही आला नाहीत आमचेकडे ,या एकदिवस . " होय , येऊ जरूर , चला निघतो "


शुभमने मदर्स डे ला मला कधीच ग्रीटिंग , भेटवस्तू तर दिलीच नाही पण " Happy mother's day, mamma " अशा शुभेच्छाही दिल्या नाहीत .


कशानुळे इतका आकस असेल याच्या मनात . " नाही , आकस कसला मीना , तुझाच मुलगा आहे तो ,नसतो कोणाचा स्वभाव बोलका , ग्रीटींग , भेटवस्तू , शुभेच्छा दिल्या तरच तू त्याची आई असणार आहे काय ? नाही ना ," माझे मी मलाच समजावले , विचारांच्या गर्तेत कोठल्या कोठे भरकटलो आपण .


आज रविवार , आठवडाभराची सगळी साचलेली कामे तर होतीच ,सुटीचा दिवस म्हणून स्वयंपाकाचा मेनूही मोठा राहातो , " मीनाक्षी , आज रविवार , गोड बनवतेय तर थोडा शिराही बनव , मदर्स डे आहे आज , आईला भेटून येतो वृद्धाश्रमात , तिच्या आवडीचा शिरा घेऊन जातो ." " बाबा मी पण येईन आजीला भेटायला , बघा तिच्यासाठी ग्रीटींगही बनवलयं मी स्वतः , कसं झालंय ? " एक वृद्ध आजी , व तिच्यासमोर बसलेला तिचा नातू , छान चित्र रेखाटलं होत. पोरानं "

" होय बेटा , जाऊ आपण आजीकडे "


 अच्छा , तर ही अढी आहे याच्या मनात . पण शुभम मी नाही पाठवलं रे तुझ्या आजीला वृद्धाश्रमात ."


लग्न होऊन मी गृहप्रवेश केला आणि सासूबाईंना वाटलं कि घराची सत्ता आता हिच्या हाती जाणार , माझा मुलगा हिचा होणार . मग कशावरुन ना कशावरून रोज घरात कुरबुरी होऊ लागल्या ,मी काही मेनू बनवला तर सासूबाई त्यात त्रुटीचं काढायच्या. मी भेंडी मसाला केला तर मला हे नको , भरली वांगी हवीत . बरं रोजचा मेनू तुम्ही ठरवून द्या , मी तेच बनवीन , तर ते ही नको , " आयुष्यभर केलं मी , आताही विश्रांती नको " सणवार यांना अगदी साग्रसंगीत हवीत . पण माझी नोकरी व टाईमाचं गणित जमेना . चंपाषष्ठी अगदी दांपत्य भोजनासह झाली पाहिजे , माझी जवाबदारीची पोस्ट , मला आॅफीसमधून रजा घेणंही शक्य होईना . " सासूबाई आपण चंपाषष्ठी रविवारी साजरी करूया , अगदी दांपत्य भोजनासह " " वाह म्हणजे आता तू सणावारांची तिथीही बदलणार तर ," आणि वादाला सुरूवात .प्रकाशने माझ्यासाठी साडी आणली आणि आईसाठी नाही आणली असे कधी घडले नाही , पण सासूबाईंना ते ही सहन होईना ." एक दिवस मी तापाने फणफणले .यांच्या पूजेची मी तयारी करू शकले नाही ,नाही स्वयंपाक घरात काही काम " " नाटकं आहेत नुसती , काय धाड भरलीय ," . प्रकाशनेच चहा केला , आईला दिला , मला दिला , " करा , करा सेवा , काय दिवस आलेत . नवर्‍यानेच बायकोची सेवा करायची "


प्रकाश काही बोलले तर , " वाह छान , तू बायकोचीच बाजू घेणार , चूक माझीच असणार ना .माझंच नशीब खोटं ग बाई , म्हणत यांचं रडणं सुरू व्हायचं .


आणि एकदिवस तर कहरच झाला , मला नाही राहायचं या घरात माझ्या दोघी मैत्रिणी सुमा आणि उमा आहेतच वृद्धाश्रमात . घरच्या कटकटींपासून दूर , आनंदात जगत आहेत . मी जाईन तिथे .


उद्याच्या उद्या वृद्धाश्रम प्रवेशाची सगळी प्रक्रिया पूर्ण कर ." " आई , ऐक माझं , नको असं करूस . मला पोरकं नको करूस . या घरावर तुझी माया राहू दे ."


" सासूबाई , नका असं करू . काही चुकलं माझं तर मुलगी समजून माफ करा " " हं ,पुरे झाला हा मानभावीपणा , तू आलीस , आणि माझा मुलगा दुरावला " " माझे थोडे दिवस राहिलेत आता , आनंदाने जगू दे मला "


आणि माझ्या सासूबाई देविकाबाईंनी वृद्धाश्रमाची वाट चोखाळली .


विचाराच्या भोवर्‍यातून मी बाहेर आले .


" होय प्रकाश , मी बनवते शिरा , चांगला दूध , केळी , सुकामेवा घालून अगदी सत्य नारायणाच्या प्रसादासारखा . आणि ऐकलं काय ,मी पण येईन तुमच्यासोबत वृद्धाश्रमात "


वृद्धाश्रमात सासूबाईंचे मैत्रिणीसोबत काही दिवस चांगले गेले , पण तेथील उपरेपण , एक प्रकारचं शिस्तबद्ध वातावरण ,इतर वृद्धांच्या समस्या , त्यांची दुरावलेली मुले , त्यांचा समाचारही कधी न घेणारी , तर वृद्ध मंडळीच्या अंत्यसंस्कारही वृद्धाश्रमच करीत होतं .हे सगळं पाहून देविकाबाई हतबल होत . "त्यामानाने प्रकाश आणि मीनाक्षी ने तर नेहमी त्यांचा सन्मानच केलेला , काळजी घेतलेली , आणि येथे आपण स्वतःहून दाखल झालो , मुले नको म्हणत असतांना , पण हे उशीरा सुचलेलं शहाणपण ."देविकाबाई विचार करून सुन्नं होतं .


" देविकाबाई , बघा कोण आलंय तुम्हांला भेटायला , आश्रमातील सेवेकरी मधुकर माझा नातू शुभमला घेऊन आला . " आजी " म्हणत तो देविकाबाईंना बिलगला . तू एकटा आलास बाळ ,? " नाही आजी , पप्पा आणि मम्मीसुद्धा आलीय " " काय सांगतोस पप्पा मम्मी आलेत " " होय आई , आम्ही आलोत " आणि सासूबाई , तुमच्या आवडीचा शिरा आणलाय , खाऊन घ्या आणि आपलं सामान पॅक करा , आपल्याला घरी जायचंय .तोपर्यंत प्रकाश वृद्धाश्रमाच्या कागदपत्रांची पूर्तता करतील .


" गुणी गं , माझी बाळ " म्हणत सासुबाईंनी मला आज जवळ घेतलं.त्यांचे भरलेले डोळे मी अलगद पुसले .


शुभम हे सगळं पाहात होता , मला व आजीला त्याने मिठीत घेतले . My mummy is best mummy in the world. .Happy mothers day mamma " म्हणतांना त्याचा चेहरा अत्यानंदाने खुलला होता .


आज शुभमच्या मनाची निरगाठ सोडवण्यात मी यशस्वी झाले होते.


Rate this content
Log in