Abhilasha Deshpande

Inspirational

3  

Abhilasha Deshpande

Inspirational

खरे मित्र

खरे मित्र

1 min
134


 राम श्याम हे दोघे लहान पणापासून मित्र होते. दोघेही अनाथ होते. चिंचोली गावात एक दिवस आले. मंदिरात झोपले.गावातल्या लोकांनी त्यांना विचारले कोठून आले. पण त्यांना सांगता आले नाही. दोघानीही त्या गावात राहण्याचे ठरवले. रामू पायाने अधू होता. गावातले लोक मूल लहान म्हणून खायला अन्न देत होते. मंदिरात झोपण्यासाठी सतरंजी व चादरी सुध्दा दिला. पोलिस स्टेशन मधून कोणाची मुल आहेत तपास काढत होती. मुल थोडी मोठी झाली. रात्रीच्या शाळेत जावू लागली. दिवसा बेकरीमधले पाव विकायची व पैसे मालका जवळ आणून द्यायचे. व त्याची मजुरी म्हणून तो मालक द्यायचा.  व शाळा झाल्यावर मंदिरात झोपायचे व मजुरी आलेल्या पैशात काही तरी खायचे. असे काही वर्षे गेली. दोघेही दहावी पास झाली. व नंतर गावातल्या लोकांनी त्यांना सल्ला दिला 18 वर्षे झाल्यावर लघूउद्योगाला लोन घ्या व तसे त्यांनी केले. राम अधू असल्यामुळे लवकर लोन मिळाले. बेकरी मधल्या वस्तू कसे बनवतात त्यांनी निरखून पाहिले असल्यामुळे त्यांनी जमवलेल्या पैशात एक घर भाड्याने घेतले व व काही मशिनरी लोन मधुन घेतली. व ब्रेड,पाव केक बनवणे चालू केले. राम असल्यामुळे बेकरीत बसून राहायचा श्याम सायकलवर बनवलेल्या वस्तू विकायचा. बेकरीचे नाव रामश्याम असे ठेवले. त्यांची बेकरी थोड्याच दिवसात प्रसिद्धीला आली. 

त्याच्या बेकरितले वस्तू वेगळ्या गावात विकल्या जावू लागल्या. त्यांनी 2 मजूर ठेवले. असे हे दोन खरे दोस्त आपला व्यवसाय चांगले करु लागले. चिंचोली गावाच्या लोकांनी आपल्याला मदत केली. त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहे हे ते दोघे मित्र जाणून होते.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational