Abhilasha Deshpande

Thriller

3  

Abhilasha Deshpande

Thriller

धोका

धोका

2 mins
219


एक कानशिवणी गाव असत. त्या ठिकाणी एका मारवाडी समाजाचा जानकीराम शेठ याचे किराणा दुकान असते. गावात एकच दुकान असल्यामुळे गावातील रहिवाशी त्याच्या कडुन किराणा घेतात. जानकीराम त्या गावाच्या भरोशावर श्रीमंत होतो. 


  जानकीराम शेठ व जानकी व मुलगा जीवन आणि मुलगी जाई आनंदाने राहत असतात. जानकीराम शेठ ग्रामपंचायतच्या निवडणूक मध्ये उभा राहतो व निवडून येतो. तो त्या गावाचा सरपंच होतो. त्या गावात पिढीजात असलेले" गालगुंडे" नामक व्यक्ती नाराज होतात. वैमनस्य वाढते. त्यातूनच एक दिवस शहरातून जानकीराम किराणा घेऊन येत असताना त्याच्या टेंपोला धडक दिल्या जाते. त्यातच त्याचा मृत्यू होतो. त्याच्याघरातील लोक खूप रडतात. पोलीस तो अपघात म्हणून सांगतात. 


     जानकीरामचे दुकान त्याचा मुलगा जीवन चालवतो. एक दिवस जानकीराम जानकीच्या स्वप्नात येऊन सांगतो," गालगुंडेच्या वासुदेवने माझा मुद्दाम अपघात केला कारण मी सरपंच झालो हे त्याला आवडले नाही" दुसऱ्या दिवशी जानकी हे स्वप्न जीवनला सांगते. जीवन आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूळ घेण्याचे ठरवतो. वडिलांची जागा रिक्त असते. त्या जागेवर जीवन उभा राहतो व निवडून येतो. गावातील लोक जीवनला सरपंच करतात.


     वासुदेव विरोधी पक्षात असल्यामुळे त्याला कोणतेही पद दिले जात नाही. वासुदेव मनाशी विचार करतो,जीवनला कसे संपवायचे? इकडे वासुदेवचा बदला कसा घ्यायचा याचा विचार जीवन करत असतो. वासुदेवची मुलगी - वनिता जीवनबरोबर शिकलेली असते. जीवन दिसायला वडिलासारखा(जानकीराम) 

असतो. जीवन वनिताला प्रेमात पाडतो व तिची मदत घेऊन वासुदेवचा बदला घ्यायचा असा तो मनाशी ठरवतो. त्याप्रमाणे तो करतो.


   वनिता आता मोठी झाली असते. तिच्या लग्नाकरिता वासुदेव जोडीदार शोधत असतो. तो वनिताकरिता एक ठिकाण आणतो. वनिता वडिलांना सांगते" माझे एका मुलावर प्रेम आहे" त्यावर वासुदेव विचारतो मुलगा कोण आहे? ती सांगते जीवन आहे. त्याचे नाव ऐकून वासुदेव भडकतो. त्याच्याशी लग्न होऊ देणार नाही ,तो आपला शत्रू आहे. वनिता सांगते त्याच्याशी,लग्न होणार नसेल तर मी कोणाशीही लग्न करणार नाही. अविवाहित राहणार. काही दिवस जातात. जीवनला ती सर्व सांगते. जीवन तिला सांगतो माझ्या बाबाचा अपघात तुझ्या बाबांनी केला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. तु बदला घेण्यासाठी मला मदत कर? ती होय म्हणते.

 

    जीवन वडीलांसारखे वेशांतर करतो. वनिताच्या मदतीने रात्री 12 नंतर वासुदेवच्या खोलीत जातो. वासुदेव झोपला असतो. दरवाजाचा आवाज ऐकून तो उठतो. समोर "जानकीराम"ला पाहतो व घाबरतो. वासुदेवला वाटते हे आपण झोपेत बघतो आहे. त्यावर जीवन बोलतो(जानकीराम) तु अपघात करुन मला मारले हे सर्व सत्य पोलीसांजवळ सांग त्यावर वासुदेव म्हणतो तसे सांगणार नाही. त्यावर जीवन म्हणतो, (जानकीराम)" मी तुला मारुन टाकेल. वासुदेव सांगण्याचे कबुल करतो. 

   दुसऱ्या दिवशी वासुदेव अस्वस्थ असतो. आंघोळ करुन तयार होतो. बायको व मुलीला सांगतो. " मी,कामाकरिता बाहेर जात आहे. पोलीस स्टेशनला जाऊन चीफ साहेबांना सर्व घटना सांगतो. चीफ साहेब पुन्हा जानकीरामची केस उघडतात व वासुदेवला पकडतात. 


    वडलांच्या मरणाचा बदला आपण घेतला.जीवनच्या मनाला समाधान वाटते. वासुदेवला अटक केली जाते. जीवन वनितासोबत लग्न करतो. वासुदेवने जानकीरामचा,धोक्याने अपघात केला असतो. त्याचप्रमाणे जीवन वनिताच्या मदतीने रात्री त्या घरात धमकावतो व खरे बोलण्यास भाग पाडतो


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller