प्राजक्ता रामराजे पाटील

Romance

2  

प्राजक्ता रामराजे पाटील

Romance

#तुला पाहते रे...

#तुला पाहते रे...

2 mins
76


दिव्या सरपोतदारला एका आयटी कंपनीकडून परदेशात जायची ऑफर आली होती. बाबांनी लगेचच होकार दिला पण आईच्या जिवाची घालमेल सुरू होती. न राहून शेवटी आई दिव्याला म्हणाली, " नाही गेले तर नाही का गं चालणार?" दिव्यासाठी खाऊ बनवणारी आई काळजीपोटी दिव्याला बोलत होती.


दिव्या म्हणाली, "अगं आई कंपनीकडून एवढा मोठा चान्स मिळाला आहे मला, का बरे सोडायचा ? सांग बरं. आणि परदेशात जाण्याचा पहिला अनुभव अनुभवायचा आहे मला. आणि परत येणारच आहे की मी!का काळजी करतेस."

दिव्या पहिल्या दिवशी फार खुश होती, सुंदर रस्ते ते ही अगदी स्वच्छ. घरेही तशीच होती अगदी मनात भरण्यासारखी. आणि माणसं ही छान वाटली. दुसऱ्या दिवशी बॉस ने भारतातून आलेले आणि तेथील रहिवासी असलेले कंपनीतील सदस्य यांची पार्टी आयोजित केली.


परदेश म्हटल्यावर पार्टी तर असणारच.दिव्या छान त्यांच्यासारखाच राहणीमान करून पार्टीला पोहोचली. दिव्या सोबत तिची एक मैत्रीणही होती, त्यामुळे दोघी मिळून पार्टी एन्जॉय करत होत्या. तिथे राहणारा भारतीय असलेला मुलगा दिव्याकडे पाहत होता. दिव्या अतिशय सुंदर दिसत होती.


त्यांच्या कल्चर प्रमाणे पार्टी सुरू असतानाच एक माणूस दिव्याच्या जवळ येऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करू लागला. दिव्या आणि तिची मैत्रीण बाजूला जाऊन थांबल्या. तरीही त्या माणसाच्या काही लक्षातच येत नव्हतं. तो माणूस तर त्यांच्या जवळ येत होता, पण आणखी त्याचे मित्रही दिव्याच्या खूपच जवळ यायचा प्रयत्न करत होते. दिव्या खूप ऑफ वर्ड फील करत होती. पार्टीत कोणाचंच लक्ष दिव्याकडे नव्हतं, पण तो भारतीय तरुण 'प्रतीक' असं त्याचं नाव. आणि तो खरोखरच 'भारतीय संस्कृतीच प्रतीक' होता.

प्रतीकने लगेच दिव्याच्या जवळ जाऊन त्या माणसाला सांगितलं, "डोन्ट टच टू हर, आई विल कॉल नाऊ टू द पुलिस." हे वाक्य ऐकताच तो व्यक्ती बाजूला सरकला आणि निघून गेला. दिव्या प्रतीककडे पाहतच राहिली. "विश्वात असेल तर माझ्यासोबत गाडीत बसा." म्हणून प्रतीक पुढे गेला.दिव्या प्रतीककडे पाहतच राहिली. मैत्रीण दिव्याला म्हणाली, "चल आता. तुला पाहते रे...बस झालं."


प्रतीकच्या डोळ्यात खरेपणा दिसला होता आणि म्हणूनच त्या दोघी तिथल्या भयंकर वातावरणात राहण्यापेक्षा प्रतीकच्या मागे जायला तयार झाल्या.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance