Prajakta Patil

Inspirational

3  

Prajakta Patil

Inspirational

आई मला माफ कर

आई मला माफ कर

3 mins
228


"आई तुझ्या एवढं कसं लक्षात आलं नाही!" हे गणेशचे उद्गार आईच्या कानी पडतात तिच्या डोळ्यात पाणी तरळलं..


रोहिणीताई त्यांच्या मुलाकडे शहरात आल्या होत्या.. त्यांनी चुकून त्यांचा नातू सुयशला भेंडीची भाजी डब्यामध्ये भरली.. पण आज तर त्याच्या स्कूल मध्ये 'पोट्याटो डे' होता... इंग्लिश मिडीयमचे कौतुक.... असू द्या हो बाबा काही नाही होणार... मी सांगेन टीचरना.. आजीने टिफिन भरला म्हणून.....गणेश म्हणाला.


सुयशची बायको सकाळी लवकर ऑफिसला जायची... सुयश , गणेश दोघेही गेले... पण रोहिणी ताई मात्र दुखावल्या होत्या... त्या दिवसभर त्यांच्या भूतकाळामध्ये रममाण झाल्या... हा तोच गणेश ज्याला आईन नऊ महिने पोटात वाढवलं... आणि बाळंतपणानंतर तीन महिने न झोपता रात्रीचा दिवस करून त्याच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही...आज त्याच्या मात्र लक्षातच आलं नाही...

आईच्या डोळ्यात पाणी तरळले ते...


'खरंच सोपं नाही ना आई होणं....?' बोलता न येणाऱ्या आपल्या एवढ्याशा जीवाला काय हवं..,काय नको...ते फक्त तिलाच कळते... आणि आज मात्र आपल्या मुलाने आईच्या मनातलं काहीच ओळखले नाही.... आई मौन झाली हे त्याला कळालंच नाही..


मूल जन्मल्यावर आईला जेवायच सुद्धा भान राहत नाही... ती स्वतः कडे किती दुर्लक्ष करते... आपल्या सर्व इच्छा आकांक्षा विसरून जाते....फक्त आणि फक्त मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ती झटत असते... त्यांचा अभ्यास घेणे...., त्यांना खाऊ घालणं... इतकंच काय त्यांच्यासाठी शॉपिंग करणं... त्यांचा प्रत्येक डे स्पेशल करणे... यासाठी आई अहोरात्र प्रयत्न करते.... तिचं विश्व जणू मुलांमध्ये सामावले जाते.....


स्वतःच्या इच्छा आकांक्षाना बाजूला ठेवून मुलांमध्येच आपली स्वप्न रंगवू लागते.... मुले लहान आहेत तोपर्यंत मुलांना आईची किती गरज असते.... आई नसेल तर त्यांना घरात करमत देखील नाही.... ह्याच मुलानी मोठे झाल्यावर आईला का बरं विसरावं...? आई लहान असताना लहान- सहान चुका माफ करत असतेच की..., मग आई कडून झालेली चूक मुलाने का समजून घेऊ नये....?


आई जशी बोटाला हात धरून चालायला शिकवते... मुलांनी उभ रहावं म्हणून प्रयत्न करते... तसे मुलांनीही तिची म्हातारपणाची काठी का बनवू नये...? काही मुलं असतातही अशी आपल्या आईची इच्छा पूर्ण करणारी..., गुणी मुलं... पण समाजात त्यांनाही 'ममाज बॉय' म्हणून नावं ठेवलं जात... हे योग्य आहे का?' श्यामची आई' म्हणताना जशी अभिमानाने मान उंचावते... तशी 'ममाज बॉय' म्हणणाऱ्यांची झुकली पाहिजे.... रोहिणीताई दिवसभर एकट्याच विचार करत बसल्या. त्यांना सकाळच्या नाष्ट्यानंतर सुयशच्या बोलल्याने पोट भरल्याने त्यांना जेवणाचेही भान उरले नाही. सायंकाळी दारावरची बेल वाजली आणि रोहिणी ताई विचारातून बाहेर पडल्या. दरवाजा उघडून त्या थेट आपल्या रूम मध्ये जावून मौन धारण करून बसल्या.

ऑफिसमधून आल्यावर पाणी आणि गरमागरम कॉफी घेऊन येणारी आई आज आपल्याला न पाहताच निघून गेली. म्हणून सुयश विचार करत असतानाच त्याचा मुलगा गणेश त्याला सांगतो, "बाबा, तू सकाळी आजीवर रागवलास ना त्यामुळे आजी चिडली आहे बहुतेक..हे संभाषण सुयशची पत्नी ऐकते आणि काय घडले हे तिला समजते. तेव्हा ती सुयशला आईची माफी मागायला लावते. किती करतात आई आपल्यासाठी!! हेही सुयश ला दाखवून देते. सुयश ला आपली चूक समजते आणि तो आईच्या रूममध्ये जाऊन तिची माफी मागतो. पुन्हा ही चूक कधीच होणार नाही या मुलाच्या वाक्याने आईचा राग लगेच वितळतो आणि सुरेश ला जवळ घेऊन आई मौन सोडते. सुयश आणि रोहिणी ताईच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational