शांत एकांत त्या रात्री
शांत एकांत त्या रात्री
स्पर्शात गंधाळलेल्या मनाने गालात हळूच ते हासने
शहारलेल्या त्या क्षणाला मी डोळ्यात साठवून घेतले
श्वासात श्वास गुंतताना ह्यदयाचे धडधडणे वाढले
खेचुन कवेत तु ओढताना मी न माझी राहीले
चांदण्यांच्या सावलीने खिडकीत डोकावून पाहीले
स्वप्नात रंगलेल्या जीवाला उठवून सत्यात आणले
मीठीत कंवटाळलेल्या उशीला दुर मी सरसावले
शांत एकांत त्या रात्री डोळ्यात अश्रू दाटले.....