सुखावल्या मनाचा निःश्वास
सुखावल्या मनाचा निःश्वास
1 min
65
मोर पिसारा फुलवीत होता
थेंब सरिंचे झेलत होता
गंध मातीचा उधळत होता
गुंतलेल्या नात्याचा क्षण बहरत होता
भरलेल्या ढगाचा गडगडाट होता
हळुवार मला तो कुशीत घेत होता
सुखावल्या मनाचा निःश्वास होता
आधार मज आता फक्त त्याचाच होता.