सरी बरसताना
सरी बरसताना
बरसणाऱ्या सरी मातिमध्ये विलीन होत असताना
पडणारा प्रत्येक थेंब त्या क्षणाची साक्ष देत असताना
पाखराची त्यांच्या खोपीत किलबिल सुरु असताना
आई पिलांची चोचित खायला घेऊन येत असताना
ढगांचा गडगडाट अन वाऱ्याची शर्थ चालू असताना
मन बेफिकीर होऊन नाचत होते सरी बरसतांना