औपचारिकता नात्याची
औपचारिकता नात्याची
औपचारिकता नात्याची विरून गेलेल्या गंधाची
मनातुन ओघळणाऱ्या थेंब थेंब अश्रुंची
औपचारिकत नात्याची पुसट झालेल्या आठवणींनची
विणलेल्या बंधनाची सुटलेली गाठ सावरण्याची
औपचारीकता नात्याची हरवूनी गेलेल्या क्षणांनची
गंतव्य जरी एक तरी दोन वेगवेगळ्या प्रवासाची
औपचारिकता नात्याची उमजुन न कळत निर्णयाची
कथा दोन तुटून विभक्त झालेल्या हृदयाची.