मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

2.6  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

ऐक ना

ऐक ना

1 min
176



इतके आघात, इतक्या वेदना आणि इतके सारे भोग भोगल्यानंतर,

जेव्हा स्वतःवर असलेला विश्वास ही मी गमावून बसले होते,

तेव्हा अशा वळणावर तू भेटलास मला...

त्यावेळी खूपच नाजूक झालेल्या माझ्या मनाला तू तुझ्या हळव्या शब्दांनी कवेत घेतलंस,

खूप जपलंस त्याला,

आणि मी ही मग हळूहळू तुझ्या ओढीने तुझ्याजवळ येत गेले...कळत होतं सारं तरी न कळल्यासारखं...

पुन्हा प्रेम वगैरे नको असताना,

सगळीकडे फक्त स्वार्थ दिसताना,

तुझ्याजवळ येण्याचा हा प्रवास मला सुखावत होता,

प्रेमाच्या असंख्य आणाभाका ऐकलेली मी आज खरं काहीतरी अनुभवत होती...

मग विचार आला कधी आणि कुठवर ?

आपण प्रेमाची कबुली देत नाही तोवर ? हो ना ?

माहीत नाही पण आता भिती वाटते. जवळ आलेल्या प्रत्येकाने ओरबाडलंच असताना तुला माझ्याकडून कसलीच अपेक्षा असू नये, हा विचार आता अस्वस्थ करतो.

यात तुझी चूक नाही, तू खरा असशील तर हे कायम अबाधित राहील आणि कालांतराने माझी भिती ही कमी होईल.

पण हा ही आभास च असला तर ?

कुणीतरी तिसरा आपल्याला तोडून गेलेला असताना आपण कुणातरी जवळ येऊ पाहणाऱ्याला ही त्याच तराजूत तोलतो. खात्री करून घेतो, वेळ घेतो. त्यात ही फसवणूक न होण्याची शाश्वती नाही पण किमान आपण आपला वेळ घेतल्याचं समाधान नक्की असेल.

तू असंच जीवापाड जपत रहा मला,

हे सगळं मला माझं विखुरलेलं आयुष्य सावरायला मदत करतंय.

वेळ घेतेय, समजून घेशील अशी अपेक्षा आहे...कारण माझ्या काळजावर होणारा प्रत्येक वार नेहमी तुला आधी घायाळ करत आलाय...


तुझी लाडकी,


मन एक लेखणी 



Rate this content
Log in