मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

अनोखं प्रेम

अनोखं प्रेम

2 mins
644


सँडी: "अगं,तुला माहिती आहे कां.. जगात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे."


नवेली: "ते तर नेहमीच होत असतं... तुम्ही आधी बाजारातून भाजी आणा बरं."


सँडी: "अगं पण युक्रेनची अवस्था बघून वाईट वाटते."


नवेली: "येथे किचनचा युक्रेन झाला आहे, जरा किचनमध्ये मदत करायला नको या माणसाला."


सँडी: "युनोने नुसती बघ्याची भूमिका घेतली आहे."


नवेली: "नक्कीच तुमचे नातेवाईक असतील युनोमध्ये. नुसता इतरांचा घरातील तमाशा बघायला पाहिजे तुमच्या नातेवाईकांना."


सँडी: "पण मला वाटते, अमेरिकेने ऐनवेळी असा पळपुटेपणा नको व्हता दाखवायला."


नवेली: "पळपुटेपणाच्या गोष्टी तुम्ही तरी करु नका. बाथरूम मध्ये झुरळ दिसले तर संपूर्ण बिल्डिंग डोक्यावर घेता तुम्ही."


सँडी: "तुझ्यासाठी घर म्हणजे जग. कधीतरी जगात काय चालले आहे हे जाणून घेत जा. भारताने युनोत तटस्थ भूमिका घेतल्यापासून मी अस्वस्थ झालो आहे."


नवेली: "घरात पोरांची भांडणे चालू असताना तुम्हीही तटस्थच तर असता. तेव्हा बरं तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही."


सँडी: "घरकोंबडी झाली आहे तू... खुराड्यात बस. अवघे जग पुतीनला नावे ठेवत आहे, हे तरी तुला माहिती आहे कां?"


नवेली: "ते माहिती करुन काय करु... घरातील सिलेंडर संपला आहे... लाईट बील भरायचे राहिले आहे... हे मात्र तुम्हाला माहिती नाही. सिलेंडर संपला तर काय पुतीन त्याच्या घरातील सिलेंडर आणून देणार आहे?"


सँडी: "तुझ्याशी बोलणेच व्यर्थ आहे."


नवेली: "मी काय चर्चेसाठी शिष्टमंडळ घेऊन आले होते कां तुमच्याकडे?... तुम्हीच मघापासून किचनमध्ये रशिया-युक्रेनचे पीठ मळत बसला आहात."


सँडी: "तू आणि तुझ्या माहेरचे लोक... एकजात सगळे मठ्ठ अडाणी....."


नवेली: "हो कां? आणि तुमच्या घरचे लोक कोण आहेत... नाटोवाले की जी-7 वाले.? चावडीवर बसायची लायकी नाही, अशी तर तुमच्या नातेवाईकांची थोबाडे."


सँडी: "तो तुझा भाऊ.. बायडेन आहे तो तुमच्या घरातील. नुसत्या बाता ऐका त्याच्या. ऐनवेळेला मात्र पसार होतो."


नवेली: "माझा भाऊ बायडेन असेल नाही तर डोनाल्ड ट्रम्प.... कमीत कमी तुमच्या भावासारखा तो इम्रान खान तर नाही. तुमच्या भावाचे हात कायम लोकांसमोर भीक मागण्यासाठी पसरलेले."


सँडी: "पसरला हात तर पसरु दे माझ्यासमोर.. मी त्याचा भाऊ आहे... देणार मी त्याला पैसे... काय करणार तू...."


नवेली: "द्या हो पैसे जेवढे पाहिजे तेवढे द्या पैसे. लोकांना वाटा पैसा आणि घराचा करुन ठेवा अफगाणिस्तान."


सँडी: "घर अफगाणिस्तान तेव्हाच झाले होते जेव्हा तुझ्यासारखी तालिबान या घरात आली."


नवेली: "मी तालिबान काय... मग तुम्ही काय पाकिस्तान बनून माझ्या वडीलांकडे माझा हात मागण्यासाठी आला होता?"


सँडी: "चूक झाली होती माझी.... मला काय माहिती होते की ज्याला मी मटण समजत होतो, ते सोयाबीन असेल."


नवेली: "अहो सोयाबीन तर लोक कमीत कमी आवडीने तरी खातात... तुम्हाला तर कोणत्या मुलीने लोणचं म्हणूनही ताटात ठेवले नसतं."


सँडी: "फसलो मी लग्न करुन.... तुझ्या वडिलांनी तुला माझ्या गळ्यात टाकून मला फसवले."


नवेली: "तुम्हाला कोण फसवत नाही हो. नाक्यावरचा भाजीवालाही तुम्हाला फसवतो."


सँडी: "भाजीवाले असतातच हरामखोर. लोकांना फसवतात. अगदी नाटो देशांनी युक्रेनला फसवले तसे."


नवेली: "आलात कां पुन्हा रशिया-युक्रेनवर. वाजले किती बघा. जा बाथरूम मध्ये बादली भरून ठेवली आहे. त्या बादलीला पॅसिफिक महासागर समजून आंघोळ करा."


सँडी: "अगं पण......"


नवेली: "जाता की नाही... मला उगाच व्हेटो वापरायला लावू नका."


सँडी: "ओके..."



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance