मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Inspirational

नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास

नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास

5 mins
403



 भाग दुसरा- २


आयुष्यात सगळं बरोबर मनाजोगतच चाललं होतं. नव्या चा स्वभावाच प्रेमळ होता. 

नाती उगाचच टिकत नसतात, त्यासाठी निस्वार्थीपणे जीव लावावा लागतो. असे अनेक जिव्हाळ्याचे लोक नव्याने जमवले होते, त्यांनाही तिने ओजसच्या वाढदिवसाला बोलावले होते. त्यात ओजसचे फ्रेंन्ड्स, सँडी चे ही ऑफीस कलीग्ज् होते. नव्याची जय्यत तयारी सुरु होती. 


सँडीला कार्यक्रमाच्या दिवशी सुट्टी घ्यायचीच होती. पण काही फॉरेन डेलिगेट्स येणार असल्याने सँडी ला त्या दिवशी ऑफिस ला जाणं टाळता आलं नाही. तशी ही सगळी व्यवस्था नव्याच पाहत होती, बरीचशी कामं लावली गेल्याने सँडी ही थोडा निश्चिंत होता. ओजस ची गाडी जाम खुशीत होती, त्याची नव्या ला आनंदाने मदत करणी सुरु होती. फक्त केक ची डिलीव्हरी ऐन वेळेवर सांगितली होती. सँडीला लवकर निघायचं होतं, ते ही जमेल असं वाटत नव्हतं, म्हणून त्याने फोन करून वेळेवर पोहचतोय, हे कळवलं. 


तेवढ्यात केकच्या दुकानातून फोन आला की केकची डिलीव्हरी करायला माणूस अव्हेल्बल नाहीये, त्यामुळे केकची डिलीव्हरी होऊ शकणार नाही. ओजस चा मूड ही तिला सांभाळायचा होता. तिने सगळी तयारी केली आणि लगेच केक घेऊन येते, असं ओजसला सांगून निघाली. 

घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. ओजस तयार होऊन सँडी आणि नव्याची वाट पाहत होता. सँडी ला ओजसने फोन लावल्यावर, त्याने ऑन द वे आहे, दहा मिनीटात पोहोचतो, असं उत्तर दिलं. नव्याला फोन केल्यावर तिने ही केक घेतलाय आणि दहा-पंधरा मिनीटात पोहोचते, असं उत्तर दिलं. ओजस आता म्यूझीक स्टेशन ची सेटींग करण्यात गुंतला होता. घराच्या एका भागत ओजसची टीन एजर्स ची बर्थडे थीम होती. तर दुसरीकडे नॉर्मल मित्रांचा कट्टा होता, जेणेकरून सँडी ही एन्जॉय करेल. एवढ्यात बेल वाजली, दारात सँडी होता, “ नव्या, सॉरी - सॉरी, मला नं ज़रा उशीरच झालाय, पण डोन्ट वरी, आता मी तुझ्या समोर हजर आहे, तू सांग फक्त काय करायचंय”. 

ओजस सांगू लागला, “अरे बाबा, ती अजून आली नाहीये, केक आणायला गेलीये, पण तिला फोन केलाय, पोहचतच असेल”.


परत बेल वाजली, आता मात्र परत नव्या नसून नव्या-सँडी चे काही फैमेली फ्रेंन्ड्स होते. २०-२५ मिनटं होत आली होती, लोकं यायला सुरवात होतेय म्हटल्यावर सँडीने नव्याला फोन लावायला घेतला तर नॉट रिचेबल आला, सँडी तोंडातल्या तोंडातच बरळला, नेहमीप्रमाणे हिने कामाच्या गडबडीत नक्कीच फोन चार्ज केला नसेल. कार्यक्रमाच्या गोंधळातही घडाळाचे काटे सँडीला स्पष्ट ऐकायला येत होते. नव्या ला सतत फोन लावणं सुरु होतं. पण अजूनही तिचा फोन नॉट रिचेबलच होता. 


वाट पाहून डोळे थकले होते. आलेल्या गेस्ट्स च्या ही एव्हाना लक्षात यायला लागलं होतं की काही तरी गोंधळ सुरु आहे.


सँडी तडक नव्या शोधायला केकच्या दुकानावर जाण्यासाठी निघाला. मनात असंख्य विचारांनी जाळं विणायला सुरुवात केली होती. रस्त्यात ट्रैफिक जैम होतं, तरीही हा रस्ता काढत निघत होता. रस्त्यात अक्सिडेंट झाला होता , असं लक्षात आलं. रस्तातून वाट काढत जातांना सहज लक्ष गेलं , तर नव्याचीच गाडी दिसली. डोळ्यांनी पाहिलेलं मनाने जरी मान्य केलं नाही तरी डोळ्यांनी बुद्धीला शहानिशा करण्याचे संकेत कधीच दिलेले असतात. बुद्धीकडून मिळालेल्या संकेतानुसार सँडीने गाडी घटना स्थळाकडे वळवली. गाडी आणि नंबर प्लेट पाहिली, गाडी तर नव्याचीच होती , गाडीचा पुढचा भाग पुर्णपणे डैमेज् झाला होता. सँडीची नजर आता नव्याला शोधत होती. ड्राव्हर सिटवर कोणीही नव्हतं. त्याने आजूबाजूला बघायला सुरूवात केली. तरीही नव्या दिसत नाहीये म्हटल्यावर कावराबावरा झालेला सँडी तिथेच उभ्या असलेल्या ट्राफिक पोलिसाकडे धावला आणि त्याला विचारू लागला, “अहो साहेब, ह्या गाडीत असलेल्या बाई कुठे आहेत“. 


ट्राफिक पोलिसाने ही अगदी रूक्श पण कणखर आवाजातच विचारलं, “तुम्ही कोण?“

मनातून पूर्णपणे हललेला सँडी उत्तरला, “मी नवरा तिचा!” 


आता नवराच समोर आहे म्हटल्यावर ट्राफिक पोलिसाने सांगायला सुरूवात केली, “अहो, सिग्नल ग्रीन झाला आणि बाईंनी(नव्या) गाडी काढली, तेवढ्यात पलिकडून एक १२-१३ वर्षाचं मुलं सायकलवर भर्दाव येतांना दिसलं, त्याला वाचवाव म्हणून बाईंनी स्टेअरिंग वळवलं आणि जाऊन धडकल्या समोरच्या भिंतीला. माझी ड्यूटी ह्याच सिग्नल ला होती. मी पाहिलं ना ते. लगेच धावत गेलो पाहिलं तर बाई अनकॉन्शीअस् झाल्या होत्या. लगेच अैम्बूलन्स बोलावली आणि हॉस्पीटल ला पाठवलं. पण मोबाईल बंद झाल्याने तुम्हाला कॉन्टैक्ट नाही करता आला. बाईंच्या सगळ्या वस्तू पोलिसांच्याच ताब्यात आहेत.” 


अजून वेळ आहे , अजून वेळ आहे म्हणून वेळ कधी निघून गेली, हे सँडीला कळलच नाही. 


आता मात्र त्याला जाणवत होतं , मी का वेळेवर आलो नाही? , का सगळीकडेच नव्याला ग्राह्य धरलं ? किमान ही घटना तरी टळली असती. असं सँडी ला वाटणं स्वाभाविक होतं, पण होणारी गोष्ट काही टळत नाही. 


इकडे बराच वेळ झाला अजून सँडी चा ही काही निरोप नाही म्हटल्यावर ओजसने सँडी ला फोन केला. सँडी च्या आवाजावरूनच ओजसच्या लक्षात आलं. तसा ओजस लहानच होता. सँडीने ओजसला मी आईला घेऊन येतोय, असं म्हणून अजय काका ला फोन दे , असं ओजसला सांगितलं. सँडी ने अजयला त्याच्या जवळच्या मित्राला पुर्ण हकीकत सांगितली आणि ओजस व आलेल्या गेस्ट्स् ला मैनेज कर . हे कळवून सँडी हॉस्पीटलमध्ये निघाला. 


डोकं था-यावर नव्हतं, नियतीने एखाद्याच्या आनंदावर असा घाव घालावा , यांसारखं दुर्दैव नव्हतं. ओजसला गोष्टींचा अंदाज येत होता आणि सँडीला नव्या च्या तब्येतीचा अंदाज आल्याशिवाय ओजसला काही कळू द्यायचं नव्हतं. 


सँडी हॉस्पीटल मध्ये पोहोचला. आधी त्याने नव्याला पाहिलं. नुकतंच नव्याला हॉस्पीटल मध्ये आणलं होतं, सँडीशी बोलून नव्याला इमर्जेंसी मध्ये नेऊन डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते, नव्या अजूनही अनकॉन्शीअस होती. तब्बल २-३ तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टर सँडीशी बोलला , “नव्याच्या फक्त डोक्याला मार लागलाय . कुठेही दुसरीकडे दुखापत नाहीये. सिटीस्कैन करण्यात आलाय म्हणजे नक्की इन्जूरी कुठे आहे आणि काय प्रमाणात आहे, हे कळायला मदत होईल.”


डॉक्टरांच्या मते अजून ही नव्या अनकॉन्शीअस असल्याने, तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. सँडी परिस्थिती पुढे आगतिक होता. 


या सगळ्यात रात्रीचे दहा वाजले होते. आलेले गेस्ट ही अजून तिथेच होते, कोणाचाही पाय निघत नव्हता, आणि सँडीचा पाय हॉस्पीटल मधून निघत नव्हता. 

ओजस अगदीच हिरमुसून बसला होता. सँडीने घडलेला प्रकार ओजसला सांगितला. तिला काहीही झालं नाहीये. फक्त थोडी शुद्धीवर नाहीये. ती शुद्धीवर आली की मी लगेच घरी येतो. सँडीला ओजसची ही मनःस्थिती सांभाळायची होती. 


घर तसंच बंदकरून अजय ओजस ला त्याच्या घरी घेऊन गेला. आता फक्त ती शुद्धीवर येण्याची वाट होती. 


सँडी ही रात्रभर तसाच हॉस्पीटल मध्ये एका बाकवर पडून होता. 


रात्र रात्रीसारखीच असते, अंधारही तोच असतो. 

रात्र ज्या गतीने संपायची असते, त्याच गतीने संपणार असते. 

पण काही प्रसंगी रात्र ही , एक पर्व वाटावं इतकी मोठी वाटते . 


क्रमश: पुढील भाग तीन मध्ये



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational