मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

2  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

नैराश्य

नैराश्य

1 min
65


समुद्रावर उभी असताना लाटेने पायाखालील वाळू जशी निसटत जावी, तसा तो माझ्या आयुष्यातून निसटत जात होता....

थांबवायचं होतं त्याला, माझ्याच मिठीत घट्ट पकडून तिथेच अडकवून ठेवायचं होतं कायमचं पण वाळू सारखा तो ही जात होता...सोबत मला खेचत होता नैराश्येच्या खोल समुद्रात....

कशीबशी त्याला दूर सारून पुन्हा मी किनारा गाठीन ही, पण तिथे तो नसेल, त्याच्या प्रेमाची लाट नसेल...असेल ती फक्त पोकळी, आमच्या प्रेमाच्या ओहोटीने उपसल्या गेलेल्या त्या पायाखालच्या वाळूत निर्माण झालेली पोकळी...

अताशा पुन्हा भरतीची वाट पहायची, कुणास ठाऊक त्या येणाऱ्या असंख्य लाटांमध्ये त्याची ही एक येईल आणि पुन्हा ती पोकळी भरून निघेल...पुन्हा मी बाहेर येईन त्या किनाऱ्यावरून त्याच्यासोबत आणि सांगिन त्याला की माझाच आहेस तू, या आधी जमलं नाही रे सांगायला...

हे होण्यासाठी भरतीच्या किती लाटा झेलाव्या लागतील त्याचा हिशोब ठेवेन मी आणि तू नसलेली अशी एक एक ओहोटी वजा करत जाईन...तू जाताना शून्य करून गेलास आणि तू येईपर्यंत ही शून्य असीन मी...

भरती ओहोटी चा हा खेळ असा जीवघेणा असतो

 बघ...


Rate this content
Log in