मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

3  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Others

काळजी घे

काळजी घे

1 min
238


काही घाव, काही जखमा भरत नाहीत, त्यांना तसंच भळभळत सोडावं लागतं. सुरुवातीला खूप त्रास होतो, अगदी असह्य वेदना होतात पण जसजशी वेळ पुढे सरकत जाते, तसतसं तिची तीव्रता कमी होत जाते. मग तो घाव कायमचा भरला जातो का ? तर नाही, खरं तर तो कधीच भरला जात नाही. आपणच त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागतो.

सगळा वेळेचा खेळ आहे बघ....

आज तू जवळ नाहीस तर मी असह्य आहे, उद्या हाच असह्यपणा जगणं होऊन बसेल आणि या जगण्याची मला सवय. तू मला सोडून जाताना म्हंटली होतीस की पुढलं आयुष्य तुझ्याविना खूप कठीण जाईल. मी तेव्हा तुला दिलासा देण्यासाठी म्हणलो होतो की असं काही नसतं, आयुष्य पुढे जात राहतं,सुखाच्या व्याख्या आजूबाजूला बदलत राहणाऱ्या माणसांसारख्या बदलत राहतात. आपण किती सुखी आहोत हे मोजण्यापेक्षा आपलं किती दुःख सरतंय याचं मोजमाप महत्त्वाचं. 

आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या वळणावर आपली भेट नक्की होईल, त्यावेळी मनात काही हेवेदावे नसतील, काही कटू आठवणी नसतील. असू ते फक्त आपण दोघे. अपूर्ण असू कदाचित एकमेकांविना पण कुणासोबत तरी एक अख्खं आयुष्य पूर्णत्वाला घेऊन जात असल्याचं समाधान असेल हे मात्र नक्की. मग आता तूच मला सांग, माझ्याविना जगणं कठीण होण्यापेक्षा माझ्या आठवणीत रमणं कधीही सोप्पं ना. मी तेच करतोय, करत राहीन...तू ही तेच करत असावीस...बहुतेक...


काळजी घे....


मन एक लेखणी



Rate this content
Log in